घरमहाराष्ट्रमंत्रिपद न मिळाल्याने सेनेचे आमदार नाराज!

मंत्रिपद न मिळाल्याने सेनेचे आमदार नाराज!

Subscribe

मंत्रिपद न मिळाल्याने सेनेचे १४ आमदार नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.

महाविकास आघाडीचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षातील नाराजी आता चव्हाट्यावर येत आहे. यामध्ये शिवसेना पक्षात सर्वाधिक नाराजी दिसून येत असून मंत्रिपद न मिळाल्याने सेनेचे १४ आमदार नाराजीत असल्याचे कळत आहे. विशेष म्हणजे या सर्व आमदारांना अनुभव असून देखील त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विश्रांती देत नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली आहे. त्यामुळे हे नाराज असलेले आमदार मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आपली नाराजी व्यक्त करणार आहेत.

हे आमदार आहेत नाराज

मंत्रिमंडळ विस्तारामुळे अनेक आमदार नाराज झाले आहेत. तसेच मंत्रिपदाचा अनुभव असलेले दिवाकर रावते, रामदास कदम, भास्कर जाधव, रविंद्र वायकर, सुनिल राऊत, दीपक केसरकर, तानाजी सावंत यांसारख्या अनुभवी चेहऱ्यांना विश्रांती दिली आहे आणि नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच हे करताना अनेक इच्छूकांचाही ऐनवेळी पत्ता कापण्यात आला आहे. यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये खदखद वाढली असून ती अनेक प्रकारे बाहेर येऊ लागली आहे.

- Advertisement -

रामदास कदम देणार राजीनामा

रामदास कदम प्रचंड नाराज असून ते शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच शिवसेनेचे ओवळे – माजिवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करुन शिवसेनेत आलेले कोकणातील नेते भास्कर जाधव यांनीही उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नाही, असे म्हणत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

तर फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहिलेले तानाजी सावंतही नाराज असून त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांना फोन करून जाब विचारल्याचे कळते. यावेळी उद्धव आणि सावंत यांच्यात खटके उडाल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. एकीकडे मंत्रिपद हुकल्याने नाराजी असताना दुसरीकडे संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आल्याने यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी नाराज असल्याचे कळते.

- Advertisement -

हेही वाचा – मध्य प्रदेश : कोट्यधीश उद्योगपती कुंटुंबाच्या लिफ्टचा अपघात; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -