घरमहाराष्ट्रTaliye landslide : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज पूरग्रस्त तळीये गावाचा पाहणी दौरा

Taliye landslide : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज पूरग्रस्त तळीये गावाचा पाहणी दौरा

Subscribe

रायगडमधील महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आत्तापर्यंत ४० निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ३५ घरांवर दरड कोसळून कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली. त्यामुळे अख्खं गाव अक्षरश: स्मशानभूमीसारखे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी तळीये गावात जाऊन पाहणी दौरा करणार आहेत.

या दौऱ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी १२ वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना होत आहेत. महाड येथील एमआयडीसी हेलिपॅड येथे पोहोचून ते वाहनाने तळीये गावासाठी रवाना होतील. दुपारी १.३० वाजता तळीये येथे पोहचून ते दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करतील. यानंतर दुपारी ३.२० वाजता ते परत महाड होऊन मुंबईकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील. तळीये गावातील सध्या स्थितीचा आढाव घेत ते दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांची विचारपूस करणार आहे. तसेच वाचाव कार्यासंदर्भात आढावा घेणार आहेत.

- Advertisement -

रायगडच्या महाडमध्ये मुसळधार पावसाने दाणादाण उडाली आहे. या पावसामुळे डोंगर कपारीत वसलेल्या तळीये गावात मोठी दरड कोसळली. या गावातील जवळपास ३५ घरे दरडीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे गावाचे होत्याचे नव्हते झाले. स्थानिक नागरिकांनी आत्तापर्यंत मातीच्या ढिगाऱ्याखालून ४० जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. मात्र अद्याप ७० ते ८० नागरिक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.

- Advertisement -


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -