घरCORONA UPDATECorona Update : राज्यात रविवारी १६९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर १७२...

Corona Update : राज्यात रविवारी १६९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर १७२ कोरोनामुक्त

Subscribe

एकीकडे देशात दिल्ली आणि हरयाणासह काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत चढ उतार असून राज्यात सक्रिय कोरोना रुग्णसंख्या एक हजाराखाली असून आज यात १६९ नव्या कोरोना रुग्णसंख्यांची नोंद झाली आहे. तर १७२ कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच गेल्या चोवीस तासात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे.

राज्यात सध्याचा मृत्यूदर १.८७ टक्के आहे. तसेच राज्यामध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के झाले आहे. राज्यात सध्या ९९५ सक्रिय कोरोना रुग्ण असून सर्वाधिक रुग्ण मुंबईत असून त्यांची संख्या ६२८ कोरोना रुग्ण आहेत. तर पुण्यात २०९, ठाण्यात ७५ सक्रीय रुग्ण आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -