काही लोकांना असं वाटत ते म्हणजेच महाराष्ट्र आहे- देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला

Cyclone Tauktae: Fadnavis ask question to state governmet Storm alert, why NDRF team was not deployed
Cyclone Tauktae: वादळाचे अलर्ट असून NDRF टीम तैनात का नव्हत्या, फडणवीसांचा सवाल

महाराष्ट्र दिन फक्त साजरा करण्याचा दिवस नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्याचा दिवस आहे. पण काही लोकांना असं वाटत की तेच महाराष्ट्र आहे. असे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सोमय्या ग्राऊंडवर आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या बुस्टर डोस सभेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.

यावेळी फडणवीस म्हणाले की काही लोकांचा असा समज आहे की त्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आणि त्यांचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राचा सन्मान. पण मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. तर महाराष्ट्र हा १२ कोटी लोकांचा समृद्ध प्रदेश आहे. तुम्ही म्हणजे मराठी नाही हे देखील सांगण्याची वेळ आली आहे. अशी टीका करत फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं.