घरताज्या घडामोडीMaharashtra Corona Update: राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत घट, २४ तासांत ६ हजार...

Maharashtra Corona Update: राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत घट, २४ तासांत ६ हजार ४३६ नव्या रूग्णांची नोंद

Subscribe

संपूर्ण देशासह राज्यात कोरोना रूग्णांचं संकट घोंघावत आहे. मात्र राज्याला आज मोठा दिलासा मिळाला आहे. कारण राज्यात कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ६ हजार ४३६ इतक्या नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३ टक्के इतके आहे. तसेच राज्यातील १८ हजार ४२३ रूग्णांना कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.७६ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ७५ लाख ५७ हजार ३४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,५६,५५,०१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,१०,१३६ (१०.३२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच राज्यात ६,७३,८७५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २,३८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण १,०६,०५९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

- Advertisement -

काल (रविवार) ६ फेब्रुवारी रोजी राज्यात ९ हजार ६६६ इतके नवीन रूग्ण आढळून आले होते. तर ६६ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, आजच्या तुलनेत (सोमवार) ३ हजार रूग्णांची घट झाली असून मृत्यूच्या संख्येतही घट झाल्याचे चित्र दिसून आले आहे.

राज्यात ओमिक्रॉनचा आकडा काय ?

राज्यात आजपर्यंत एकूण ३ हजार ३३४ इतके ओमिक्रॉनचे विषाणू बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी २ हजार २३ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण ७ हजार १४ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ६ हजार ९०१ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि ११३ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

- Advertisement -

मुंबईची आकडेवारी काय?

मुंबईत मागील २४ तासांत ३५६ इतक्या नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली आहे. तर ९४९ इतक्या रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत १०२७०९३ इतके रूग्ण बरे झाले आहे. तर बरे झालेल्या रूग्णांचा दर ९८ टक्के इतका आहे. तसेच मुंबईत एकूण सक्रिय रूग्णांची संख्या ५ हजार १३९ इतकी आहे.


हेही वाचा :Intensified Mission Indradhanush (IMI) 4.0 : मिशन इंद्रधनुष ४.० चा प्रारंभ, सार्वत्रिक लसीकरणाचे केंद्राचे उदिष्ट


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -