घरपालघरजव्हार तालुक्यातील पर्यटन विकासासाठी २.५४ कोटी रुपये मंजूर

जव्हार तालुक्यातील पर्यटन विकासासाठी २.५४ कोटी रुपये मंजूर

Subscribe

जव्हार तालुक्यातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने २.५४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यातून पर्यटन स्थळ परिसरातील विविध कामे केली जाणार आहेत.

जव्हार तालुक्यातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने २.५४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यातून पर्यटन स्थळ परिसरातील विविध कामे केली जाणार आहेत. जव्हारची वैभवशाली आणि गौरवशाली परंपरा असलेला तालुका अशी ओळख आहे. प्रभू श्रीरामांच्या वास्तव्याने व छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आदिवासींच्या संस्कृतीने नटलेला मिनी महाबळेश्वर अशीही जव्हारची ओळख आहे. आदिवासींची संस्कृती जपणाऱ्या जव्हारमधील पावसाळ्यातील वातावरण पर्यटकांना वेड लावते. तुफान कोसळणारा पाऊस, दाट धुकं, फेसाळणारे धबधबे पर्यटकांना अक्षरशः मोहून टाकतात. विपुल वनसंपदेने जव्हारला आणखीन समृद्ध बनवले आहे.

ब्रिटिशकालीन एक जूने संस्थान म्हणूनही जव्हारची ओळख आहे. जव्हारला ६३२ वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. जव्हार तालुक्यात हनुमान पॉइंट, सनसेट पॉईंट, जय विलास पॅलेस, जुना राजवाडा, शिरपामाळ, दाभोसा धबधबा, काळमांडवी धबधबा, भुपतगड अशी इतिहास प्रसिद्ध ठिकाणे आहेत. निसर्गाने मुक्त उधळण केलेल्या स्थळांना भेट देण्यासाठी पर्यटकांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत असतात. त्यामुळे पर्यटन विकासासाठी शासनाकडे मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येत होती. ऐतिहासिक आणि संस्थानकालिन वारसा लाभलेला आणि निसर्गाने मुक्त हस्ताने रंगांची उधळण केलेल्या जव्हार शहराला काही महिन्यांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटनाचा ब दर्जा भेट दिला होता. त्यानुसार जव्हार तालुक्यातील पर्यटन विकासासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरी देण्यात देण्यात आली आहे. पर्यटन विकास योजनेअंतर्गत २.५४ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे.

- Advertisement -

विकासकामांची यादी

दाभोसा धबधब्याकडे जाण्यासाठी पायऱ्या व रेलिंग करणे. जव्हार ते शिवमंदिर बाळकापरा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर संरक्षक भिंत बांधणे. सनसेट पॉईट येथे वाहनतळाचा विकास करणे व सनसेट पॉईंटकडे जाणारा रस्ता सिमेंट काँक्रीट करणे. जामसर तलावाकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. काळमांडवी पर्यटनस्थळ येथील रस्त्याचे काम, संरक्षण भिंत पायऱ्या व रेलिंग बांधणे. डेंगाचीमेट मातेरा डोंगर वळण रस्त्याला संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे. खरवंद ते खडखड रस्त्याची सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षण भिंत आणि क्रॅश बॅरीयरचे काम करणे. खरवंद ते खडखड रस्त्याची सुधारणा करणे. जामसर पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे व बैठक व्यवस्था करणे, सुशोभीकरण करणे.

हेही वाचा –

Attack on Owaisi: AIMIM च्या ओवेसींच्या दीर्घायुष्यासाठी १०१ बकऱ्यांची कुर्बानी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -