Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE New Guidelines: राज्यात मिशन बिगिन अगेन; वाचा कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स

New Guidelines: राज्यात मिशन बिगिन अगेन; वाचा कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स

महाराष्ट्रातील कोरोना निर्बंध १५ एप्रिलपर्यंत वाढवित आहेत

Related Story

- Advertisement -

राज्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्य सरकारने नव्याने गाईडलाईन जारी केल्या आहेत. त्यानुसार उद्या (रविवार) रात्रीपासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार  रात्री ८ वाजल्यापासून ते पहाटे ७ वाजेपर्यंत जमावबंदी लागू होणार आहे. चौपाट्या, उद्याने, मॉल, सिनेमागृह यासाठीही सरकारने अनेक निर्बंध घातले आहे. १५ एप्रिलपर्यंत हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

नव्या गाईडलाईन्स जाणून घ्या

 • उद्या रात्री ८ वाजल्यापासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई
 • नियमाचे उल्लंघन केल्यास प्रत्येकी १ हजार रुपयांचा दंड
 • उद्या रात्री ८ वाजल्यापासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत उद्याने आणि चौपाट्यांसह सर्व सार्वजनिक स्थळे बंद
 • विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तीला ५०० रुपये दंड तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १ हजार रुपये दंड
 • उद्या रात्री ८ वाजल्यापासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत सर्व सिनेमागृह, मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रिन्स बंद
 • सर्व प्रकारच्या सामाजिक,सांस्‍कृतिक,राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी
 • लग्‍नसमारंभांसाठी ५० व्यक्‍तींना परवानगी, तर अंत्‍यसंस्‍कारास उपस्‍थित राहण्यासाठी २० व्यक्‍तींनाच परवानगी
 • होम डिलिव्हरी आणि हॉटेलच्या वेळेलाही या नियमांचे बंधन असणार आहे. मात्र, होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे.
 • या नियमांचे हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमागृह किंवा मल्टिप्लेक्सच्या मालकांनी उल्लंघन केल्यास ही सर्वस्थळे कोरोना संकट संपेपर्यंत बंद ठेवण्यात येतील.
 • आरोग्‍य आणि अतयावश्यक सेवा वगळता इतर सर्व खासगी कार्यालयांना ५० टक्‍के कर्मचारी उपस्‍थितीचे बंधन असणार
 • सरकारी कार्यालयांमध्येही फक्‍त लोकप्रतिनिधींनाच प्रवेश देण्यात येणार
 • इतर अभ्‍यागतांना केवळ अत्‍यावश्यक कामासाठीच प्रवेश देण्यात येईल
 • इतर अभ्‍यागत ज्‍यांना बैठकांसाठी बोलावण्यात आले असेल त्‍यांना विशेष पासेस देण्यात येतील

- Advertisement -

हेही वाचा  – मुंबईत उद्यापासून नाईट कर्फ्यू, रात्री ८ नंतर फिरण्यास बंदी


 

- Advertisement -