घरCORONA UPDATEआता MMRमध्ये ई-पासची गरज नाही, खासगी कार्यालयं सुरू करण्यास परवानगी!

आता MMRमध्ये ई-पासची गरज नाही, खासगी कार्यालयं सुरू करण्यास परवानगी!

Subscribe

केंद्र सरकारने अनलॉक १.० ची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने देखील लॉकडाऊन शिथील करण्याच्या दिशेने पाऊल उचलत मिशन बिगीन अगेनची घोषणा केली. यामध्ये ३ जून, ५ जून आणि ८ जून अशा तीन टप्प्यांमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये असलेले लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यासंदर्भात घोषणा करण्यात आल्या. मात्र, त्यामध्ये आता पुन्हा एक नवीन बदल करण्यात आला असून येत्या ८ तारखेपासून एमएमआर अर्थात मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमध्ये प्रवास करण्यासाठी पासची आवश्यकता लागणार नसल्याचं सरकारने जाहीर केलं आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई या महानगरपालिकांचा समावेश आहे. यासोबतच इतरही काही नव्याने बदल केलेले नियम सरकारने जाहीर केले आहेत.

  • एमएमआरमधल्या प्रवाशांना पासची असलेली अट काढून टाकण्यात आल्यामुळे आता विशेषत: नवी मुंबईतून कामानिमित्ताने मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. याशिवाय पुढील काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
  • खुल्या जागेत व्यायाम करण्यासंदर्भातल्या नियमात नवीन अटी टाकण्यात आल्या असून आता मैदानांमधल्या व्यायामाचे बार किंवा बागेतले मुलांचे खेळाचे साहित्य वापरता येणार नाही.
  • सम-विषम पद्धतीनुसार दुकानं खुली करण्यासंदर्भातील नियोजन करण्यासाठी पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी दुकान मालकांच्या संघटनेला विश्वासात घ्यायला हवं.
  • ८ तारखेपासून सर्व खासगी कंपन्यांना १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल, तेवढ्या क्षमतेमध्ये काम करता येईल. इतर कर्मचारी वर्क फ्रॉम होम पद्धतीने घरून काम करतील.
  • ७ जूनपासून वर्तमानपत्रांची छपाई आणि वितरणाला परवानगी देण्यात आली आहे. वितरण करणाऱ्या व्यक्तींनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणं आवश्यक.
  • शिक्षण क्षेत्राशी संबंधित अधिकारी, कर्मचारी, शाळा-कॉलेजचे शिक्षक, प्राध्यापक यांना शिकवण्याव्यतिरिक्त इतर कार्यालयीन कामकाजासाठीज काम करता येईल.

mission begin again 1

- Advertisement -

mission begin again 2

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -