घरमहाराष्ट्रकष्टकऱ्यांच्या खात्यात ५ हजार द्या; भाजपची ठाकरे सरकारकडे मागणी

कष्टकऱ्यांच्या खात्यात ५ हजार द्या; भाजपची ठाकरे सरकारकडे मागणी

Subscribe

भाजपच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

भाजपच्या नेत्यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. भेटीनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना लॉकडाऊनमुळे सामान्यांचे हाल झाले आहेत. सामान्य नागरिक आणि कष्टकरांच्या खात्यात पैसे जमा करा. तसंच कष्टकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये द्या, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे, अशी माहिती पर्वीण दरेकर यांनी दिली. शिवाय, राज्यपालांकडे आम्ही लसीसंदर्भात देखील चर्चा केली, अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली.

सरकारला लॉकडाऊनची घाई होती. आज आमची बैठक होती. या बैठकीत एमपीएससी परीक्षेवर चर्चा झाली. या बैठकीत अचानक लॉकडाऊन विषयावर चर्चा सुरु झाली. तेव्हा आम्ही सर्व पक्षीय नेत्यांचे मत घेऊन याबाबत निर्णय घ्यावा, याबाबतची मागणी आम्ही केली, असं दरेकर यांनी सांगितलं. राज्य सरकार लॉकडाऊन घोषित करुन व्यापाऱ्यांना काय दिलासा देणार? हे स्पष्ट करावं. इतर राज्यांनी कोरोना काळात विविध पॅकेज जाहीर केलेत. असंघटीत कामगारांच्या बँक खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपये टाका. सरसकट लॉकडाऊन केल्यास व्यापारी, शेतकरी आणि कष्टकरींचा उद्रेक होईल, असं मत आम्ही मांडलं, असं दरेकर यांनी सांगितलं.

- Advertisement -

केंद्राने जवळपास १ कोटी ६ लाखांच्या वर लसी दिल्या. पण राज्यातील कोरोना परिस्थिती भयानक आहे. त्यामुळे आम्ही लसींबाबत राज्यपालांना विनंती केली. मुख्यमंत्री भांबावले आहेत. त्यामुळे राज्यपालांनी वाढीव लसी कशा मिळतील यासाठी हस्तक्षेप करावा अशी विनंती केली आहे, असं प्रविण दरेकर म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -