घरदेश-विदेशGood News! बँक ऑफ बडोदामध्ये ५११ जागांसाठी भरती

Good News! बँक ऑफ बडोदामध्ये ५११ जागांसाठी भरती

Subscribe

Bank of Baroda Recruitment 2021: बँक ऑफ बडोदामध्ये विविध ५११ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. याबाबती माहिती बँक ऑफ बडोदाने आपल्या अधिकृत वेबसाईटवरून दिली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २९ एप्रिल २०२१ पर्यंत आहे.

पदांची संख्या

बँक ऑफ बडोदाने एकूण आठ विविध पदांसाठी ५११ जागांची भरती प्रक्रिया राबवली आहे. यात सिनियर रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी ४०७ जागा, टेरिटरी हेड पदासाठी 44 जागा, ग्रुप हेड पदासाठी 06 जागा, प्रोडक्ट हेड (इन्वेस्टमेंट & रिसर्च) पदासाठी 01 जागा, हेड (ऑपरेशन्स & टेक्नोलॉजी) 01 जागा, IT फंक्शनल एनालिस्ट-मॅनेजर पदासाठी 01 जागा, अशा एकूण ५११ जागा भरल्या जाणार आहे.

- Advertisement -

शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव

Bank of Baroda Recruitment 2021 नुसार या सर्व पदांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी उमेदवाराने मान्याप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच या सर्व पदांसाठी कमीत कमी २ वर्षे ते जास्तीत जास्त १० वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा

या उमेदवारांना वयाची अट २३ वर्षापासून ते जास्तीत जास्त ४५ वयो वर्षापर्यंत ठेवण्यात आली आहे. मात्र प्रत्येक पदानुसार वयाची मर्यादा बदणारी आहे.

- Advertisement -

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज शुल्क

या पदांवर सामान्य आणि ओबीसी वर्गाच्या उमेदवारांना ६०० रुपये तर एसटी, एससी, पीडब्यूडी वर्गात येणाऱ्या १०० रुपयांचे शुल्क द्यावे लागणार आहे.

अर्ज कसा कराल?

Bank of Baroda च्या अधिकृत वेबसाईट जाऊन तुम्ही अर्ज करु शकता. या वेबसाईटची लिंक खालीलप्रमाणे:-

https://easiest.bobinside.com:8443/recruitment-wealthmanagement/


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -