मुख्यमंत्री शिंदेंनी टाळली छत्रपती संभाजीराजेंची भेट; दीड तास दालनाबाहेर होते ताटकळत उभे

cm ekanth shinde avoided sambhaji rajes meeting in matralaya

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे छत्रपती आक्रमक भूमिका घेत असतात. या मुद्द्यासंदर्भात आज संभाजीराजे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात आले होते. मात्र पक्ष प्रवेशासाठी आलेल्या नेत्यांना भेटण्यासाठी वेळ देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाचे प्रश्न घेऊन आलेल्या छत्रपती संभाजीराजेंना भेटण्यास वेळ देण्यास टाळाटळ केली. तसेच संभाजीराजेंनी दीड तास मुख्यमंत्री दालनाबाहेर ताटकळत उभे केले.

मराठा समाजाच्या प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी आज छत्रपती संभाजीराजे मंत्रालय येथे आले होते. प्रथम त्यांनी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची भेट घेऊन आढावा घेतला व त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनाकडे गेले. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांच्यासह मराठा समाजाचे समन्वयक व समाजाचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.

मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल दीड ते दोन तास छत्रपती संभाजीराजे यांची भेट टाळली. या कालावधीत ते पक्ष प्रवेशासाठी आलेल्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत राहिले पण समाजाचे प्रश्न घेऊन आलेल्या छत्रपती संभाजीराजे यांना वारंवार निरोप देऊनही ताटकळत राहावे लागले. या प्रकारानंतर छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री कार्यालयातून तडकाफडकी निघून गेले.


सरकारने तरुणांच्या तोंडात आलेला घास काढून घेण्याच पाप केलयं; सुप्रिया सुळेंचा घणाघात