घरमहाराष्ट्रMaharashtra Politics : आपल्या देशात काहीही घडू शकते! चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर राऊतांचे ट्वीट...

Maharashtra Politics : आपल्या देशात काहीही घडू शकते! चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर राऊतांचे ट्वीट चर्चेत

Subscribe

मुंबई : मागील काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये मोठी फूट पडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर अगदी दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीसह 85-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते कोणत्या पक्षात जाणार अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी अशोक चव्हाण यांच्यासोबत 10 ते 12 आमदारांचा गटही भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत आपली भूमिका मांडली आहे. (Maharashtra Politics Anything can happen in our country! After Ashok Chavan resignation Sanjay Raut tweet is in discussion)

हेही वाचा – Maharashtra Politics : अशोक चव्हाणांचा आमदारकीचा राजीनामा; ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया

- Advertisement -

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यासंदर्भात ट्वीट करताना संजय राऊत यांनी म्हटले की, अशोक चव्हाण भाजपवासी झाले, पण विश्वास बसत नाही. कालपर्यंत ते सोबत होते, चर्चा करत होते, पण आज ते गेले. एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्याप्रमाणे आता अशोक चव्हाणसुध्दा काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार का? आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय? असे प्रश्न उपस्थित करत आपल्या देशात काहीही घडू शकते, अशी भावना संजय राऊत यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – Rajya Sabha : भाजपाकडून राज्यसभेचे 14 उमेदवार जाहीर, महाराष्ट्रातून कोण?

- Advertisement -

अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार?

दरम्यान, अशोक चव्हाण यांनी ट्वीट करताना म्हटले की, मी 85-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे दिला आहे. मात्र अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर नांदेडमध्ये काँग्रेसच्या वर्तुळात कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. विशेष म्हणजे नांदेडच्या चव्हाण समर्थकांकडून त्यांच्या भाजपा प्रवेशाचे पोस्ट व्हायरल होऊ लागले आहेत. गेल्या बऱ्याच काळापासून अशोक चव्हाण हे भाजपामध्ये जातील किंवा भाजपामध्ये जाण्याचा विचार करत होते, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. याच सर्व पार्श्वभूमीवर आता अशोक चव्हाण हे भाजपामध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -