मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अशोक चव्हाण हे भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. काँग्रेस पक्षात मोठी धुसफूस
सुरू आहे. काँग्रेस पक्षातील अंतर्गत वादबद्दल पक्ष नेतृत्वामध्ये समन्वय घडवण्याची क्षमता नाही, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर केली आहे.
अशोक चव्हाण यांनी राजीनामा दराजीना दिला? या प्रश्नावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “यापूर्वीही मी सांगितले की, काँग्रेस पक्षात मोठी धुसफूस सुरू आहे. काँग्रेस पक्षमधील अंर्तगत वाद ऐवढा आहे की, पक्षाचे नेतृत्वामध्ये समन्वय घडवण्याची क्षमता नाही. अशोक चव्हाण यांनी कोणत्या कारणाने राजीनामा दिला हे बघावे लागेल. पण काँग्रेस पक्षात अंतर्गत धुसपूस आहे. काँग्रेस पक्षातील मोठे नेते हे भाजपाच्या संपर्कात आहेत. मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी यांचे उदाहरण घ्या. येत्या काळात आपल्याला असे खूप प्रकरणे येतील, असा दावाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. “अशोक चव्हाण यांना राज्यसभेत पाठवण्याचा प्रस्ताव अद्यापही भाजपाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याकडे आला नाही”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यसभेवर पाठवणार का? या प्रश्नावर दिली आहे.
हेही वाचा – Ashok Chavan : काँग्रेसला राज्यात मोठा धक्का! अशोक चव्हाणांच्या ‘हाता’त कमळ
भाजपाची विचारधारा स्वीकारले, त्यांचे स्वागत
अशोक चव्हाण भाजपामध्ये आले तर तुम्ही त्यांना घेणार का? हा प्रश्न विचारल्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भरताचा संकल्प, आत्मनिर्भर भारत आणि भाजपाची विचारधारा स्वीकारले, त्यांना आम्ही आमच्या पक्षात स्वागत करू”, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – Ashok Chavan: अशोक चव्हाणांबाबत कानावर हात, पण काँग्रेसचे बडे नेते आमच्या संपर्कात; फडणवीसांचं सूचक वक्तव्य
राज्यसभेची निवडणूक संघर्षाची होणार नाही
राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपा महाराष्ट्रातून किती उमेदवार उतरवणार? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “राज्यसभेत भाजपा तीन उमदेवार निवडून येतील. एवढी ताकत भाजपाकडे आहे. राज्यसभेची निवडणूक ही फार संघर्षाची होणार नाही. कारण राज्यसभेच्या निवडणुकीत प्रत्येक पक्षाकडे त्यांची ताकद आहे”, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.