घरदेश-विदेशDoctors Strike : महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे

Doctors Strike : महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे

Subscribe

केंद्रीय मनसुख मांडविया यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान बहुतांश राज्यातील निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला. मात्र महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांनी मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरुचं ठेवण्याचा पवित्रा घेतला.

विविध मागण्यांसाठी देशभरातील निवासी डॉक्टर संपावर होते. मात्र महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांनी अखेर संप मागे घेण्याची घोषणा केली आहे. संपकरी निवासी डॉक्टरांनी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या संचालकांसोबत झालेल्या ऑनलाईन बैठकीनंतर हा निर्णय घेतला आहे. या बैठकीत संपकरी निवासी डॉक्टरांच्या मागण्यांसंदर्भात तोडगा निघाल्यानंतर संप मागे घेण्याची घोषणा केली आहे.

नीट- पीजी काउन्सिलिंगच्या रखडलेल्या प्रक्रिया आणि दिल्ली पोलिसांच्या कारवाईविरोधात देशभरातील निवासी डॉक्टर संपावर गेले होते. दरम्यान केंद्रीय मनसुख मांडविया यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान बहुतांश राज्यातील निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला. मात्र महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांनी मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरुचं ठेवण्याचा पवित्रा घेतला.

- Advertisement -

यातच महाराष्ट्रातील संपकरी डॉक्टरांची वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय संचालकांसोबत बैठक झाली. या बैठकीत नीट पीजी काउन्सिलिंग प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत कंत्राटी पद्धतीने निवासी डॉक्टरांची नियुक्ती होईल, निवासी डॉक्टरांना लवकरचं कोविड भत्ता मिळेल, तसे अनेक कॉलेजेसमध्ये निवासी डॉक्टरांना स्टायपेंड वेळेवर मिळत नाही ह्यासंदर्भात देखील लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशा अनेक मागण्यांवर तोडगा निघाल्याने संप मागे घेण्यात आला. याशिवाय नीट-पीजी काऊंसिलिंग प्रक्रिया न्यायालयात असल्याने नॅशनल मेडिकल काऊंसिल कमिटीकडून सांगितल्याप्रमाणे निर्णय होईल असेही सांगण्यात आले.

यावर सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. अविनाश दहिफळे यांनी सांगितले की, जोपर्यंत स्टेट काउन्सिंलिंगचा प्रश्न मार्गी लागत नाही तसेच एचओच्या पोस्ट भरल्या जात नाही तोपर्यंत संप सुरुच राहणार आहे. मात्र अखेर महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला आहे.


Mumbai Lockdown : …तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, पालिका आयुक्तांचे मोठे संकेत


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -