घरमहाराष्ट्र'मरण पत्कारेन पण शरण जाणार नाही' हा शिवरायांचा बाणा महाराष्ट्राने काय जपला-...

‘मरण पत्कारेन पण शरण जाणार नाही’ हा शिवरायांचा बाणा महाराष्ट्राने काय जपला- संजय राऊत

Subscribe

‘झुकेंगे नही’ म्हणत विरोधकांवर बसरणारे संजय राऊत यांनी आज (19 फेब्रुवारी) पुन्हा  शिवजयंतीनिमित्त आपला कणखर बाणा दाखवला आहे. ‘मरण पत्कारेन पण शरण जाणार नाही’ हा शिवरायांचा बाणा महाराष्ट्राने कामय जपला,असं म्हणत त्यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केले आहे. तसेच “आजही आम्ही जे ताठ कण्याने आणि बाण्याने उभे आहोत ते दिल्ली पुढे झुकणार नाही, दिल्ली पुढे शरण जाणार नाही. तेव्हा औरंगजेब होता आज दुसरा कुणी असेल पण दिल्लीने कायम महाराष्ट्राला झुकवण्याचा प्रयत्न केला,असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारलाही अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

देशासह राज्यात आज ( 19 फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर आज शिवसेना नेते संजय राऊत माध्यमांशी बोलत होते. राऊत म्हणाले की, “महाराष्ट्र नाही तर देशाचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवरायांची आज जयंती आहे. छत्रपती शिवरायांकडून महाराष्ट्र एकचं गोष्ट शिकला तो म्हणजे स्वाभिमान. मरण पत्कारेन पण शरण जाणार नाही हा शिवरायांचा बाणा महाराष्ट्राने काय जपला.”

- Advertisement -

“दिल्लीने कायम महाराष्ट्राला झुकवण्याचा प्रयत्न केला”

“आजही आम्ही जे ताठ कण्याने आणि बाण्याने उभे आहोत ते दिल्ली पुढे झुकणार नाही, दिल्ली पुढे शरण जाणार नाही. तेव्हा औरंगजेब होता आज दुसरी कुणी असेल पण दिल्लीने कायम महाराष्ट्राला झुकवण्याचा प्रयत्न केला,आणि जेव्हा जेव्हा हा प्रयत्न झाला तेव्हा महाराष्ट्र उसळून निघाला” असं म्हणत त्यांनी भाजप सरकारला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

तसेच ट्विटवर देखील त्यांनी आपला आपला कणखर बाणा दाखवला आहे. शिवरायांच्या फोटोसह ‘मरण आले तरी चालेल शरण जाणार नाही’ या शिवरायांच्या विचाराचं ट्वीट करत त्यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केले आहे.

- Advertisement -


shiv jayanti 2022 : पंतप्रधान मोदींकडून शिवरायांना मानवंदना; शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -