Maharashtra Unlock: दुकानदारांना दिलासा! हॉटेल्स, रेस्टॉरंटचे नियम जैसे थे

शनिवारी सर्व दुकाने दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत

Maharashtra Unlock: state government announce new guidlines, Consolation to shopkeepers, disappointment of hotels, restaurants
Maharashtra Unlock: दुकानदारांना दिलासा! हॉटेल्स, रेस्टॉरंटचे नियम जैसे थे

राज्य सरकारची अनलॉकची नवीन नियमावली जाहीर (state government announce new guidlines)  करण्यात आली असून राज्यातील दुकानांच्या वेळा वाढवण्यात आल्या आहेत. राज्यातील २५ जिल्ह्यांला दिलासा मिळाला असून सोमवार ते शनिवार राज्यातील दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र हॉटेल्स, रेस्टॉरंटच्या पदरी निराशाच आली आहे. कारण हॉटेल आणि रेस्टॉरंटचे नियम जैसे थेच ठेवण्यात आलेत. हॉटेल्स रेस्टॉरंट रात्री ८ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवनगी देण्यात आली आहे. मात्र रात्री ८ वाजेपर्यंत हॉटेल्स रेस्टॉरंटमधून पार्लसल्स घेता येणार आहेत.  हॉटेल्स रेस्टॉरंटमध्ये बसून खाण्याबाबत कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरु राहणार आहेत.  त्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंटच्या मालकांमध्ये नाराजी दिसून आली आहे.  (Maharashtra Unlock: state government announce new guidlines, Consolation to shopkeepers, disappointment of hotels, restaurants)

शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरु राहणार आहेत. ज्या ठिकाणी रुग्णवाढ कमी होत आलीये त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात येणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यानुसार आता ४ ऑगस्टपासून नवे नियम लागू होणार आहेत.

राज्यातील कोविड संसर्ग मोठ्या प्रमाणावर असलेल्या ११ जिल्ह्यांत ब्रेक दि चेन अंतर्गत तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले असून मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या ३ जिल्ह्यांत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्बंधांबाबत ठरविणार आहे. अशा रीतीने हे १४ जिल्हे सोडून राज्यातील उर्वरीत जिल्ह्यांमध्ये निर्बंधांमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे .

या जिल्ह्यातील निर्बंध कायम राहणार 

महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा ,सांगली, कोल्हापूर, रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग,पालघर,बीड आणि अहमदनगर या ११ जिल्ह्यातील निर्बंध कायम राहणार आहेत. मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या ३ जिल्ह्यांत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्बंधांबाबत ठरवतील.

काय सुरू काय बंद 

शनिवारी सर्व दुकाने दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर रविवारी अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत. तर सिनेमागृह, नाट्यगृह पुढील सुचना मिळेपर्यंत बंदच राहणार आहेत. जिम,सलून, ब्युटी पार्ल,स्पा,योगा,पार्लर,सलून ५० टक्के क्षमतेने रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. तर सर्व सरकारी कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. वाढदिवस, लग्न समारंभ,राजकीय कार्यक्रमांना कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. सर्व सार्वजनिक उद्याने, मैदाने व्यायाम, चालणे, धावणे , सायकलिंग आदींसाठी खुले करण्यात आले आहेत. सर्व प्रकारची शेतीविषयक कामे, बांधकाम, वस्तूंची वाहतूक, उद्योग हे पूर्ण क्षमतेने सुरु राहतील.

लोकलबाबत कोणताही निर्णय नाही 

राज्यातील निर्बध शिथिल करण्यात आले असले तरी या नियमावलीत लोकलबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.  पहिल्या टप्प्यात लोकल सुरू करण्याबाबत निर्णय घेणे कठीण असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगली दौऱ्यादरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले.  काही गोष्टी टप्प्या टप्प्याने त्याचप्रमाणे त्यांचे परिणाम आणि दुष्परिणामांचा विचार करुन शिथिलता आणली जात आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


हेही वाचा –  MPSC च्या जागांची यादी पाठवलीय, आमदारांची यादी नसल्याने मंजूर कराल; रोहित पवारांचा राज्यपालांना टोला