घरठाणेदिलासा! ॲाक्सिजनसाठी रुग्णांची होणारी परवड थांबणार; ठाणे जिल्हा रुग्णालयाची विशेष यंत्रणा

दिलासा! ॲाक्सिजनसाठी रुग्णांची होणारी परवड थांबणार; ठाणे जिल्हा रुग्णालयाची विशेष यंत्रणा

Subscribe

ऑक्सिजन पुरवणारी ही पहिलीच यंत्रणा

देशभरासह राज्यात कोरोनाचा फैलाव गेल्या काही महिन्यांपासून सुरू होता. मात्र सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसतोय. या काळात व्यक्तीना कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याच्या शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी होताना दिसतेय. व्यक्तीच्या शरीरातील ऑक्सिजन कमी झाल्यास ऑक्सिजन अभावी त्याच्या जीव गेल्याच्या अनेक घटनाही घडल्या आहे. मात्र ॲाक्सिजनच्या कमतरतेमुळे या कोविड काळात अनेक कोरोना बाधित रुग्णांची परवड झाली आहे. परंतु आता ठाणेकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे. कारण ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात ॲाक्सिजनमुळे रुग्णांचे होणारे हाल कमी होणार आहेत.

ॲाक्सिजनची कायम स्वरुपी सोय

ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांकरता ॲाक्सिजनची कायम स्वरुपी सोय करण्यात आली आहे. ठाणे सिव्हील हॉस्पिटलने १००- २०० लीटर नाही तर तब्बल १० हजार आणि ६ हजार किलो लीटरच्या लिक्विड ॲाक्सिजन असलेल्या टाक्यांची यंत्रणा उभी केली आहे. ज्यामुळे सिव्हील हॉस्पिटल मधील एकाही रुग्णाला आता ॲाक्सिजनची कमतरता भासणार नाही किंवा रुग्णाला आपले प्राण गमवावे लागणार नाही.

- Advertisement -

ऑक्सिजन पुरवणारी ही पहिलीच यंत्रणा

ठाणे जिल्ह्यातील अव्याहतपणे ऑक्सिजन पुरवणारी ही पहिलीच यंत्रणा आहे. सध्या सर्वत्र अशा ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता आहे. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालयात एक कायमस्वरूपी यंत्रणा असावी, असे रुग्णालयाच्या प्रशासनाला वाटले. त्यामुळेच लिक्विड ऑक्सिजन असलेली एक यंत्रणा याठिकाणी बनवण्यात येत आहे. तिचे काम पूर्ण झाले असून येत्या काही दिवसात ही यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याचे सांगितले जात आहे.


ई-संजीवनीचा सहा हजारपेक्षा अधिक रुग्णांना लाभ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -