घरमुंबईएसी लोकलची तिकीट सवलत बंद होणार?

एसी लोकलची तिकीट सवलत बंद होणार?

Subscribe

सवलतीच्या दरात तिकीट दरांमुळे वातानुकूलित लोकलला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एसी लोकलमधील तिकीट सवलत रद्द केल्यास हजारो मुंबईकरांना भाडेवाढीचा सामना करावा लागेल.

सवलतीच्या दरात तिकीट दरांमुळे वातानुकूलित लोकलला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एसी लोकलमधील तिकीट सवलत रद्द केल्यास हजारो मुंबईकरांना भाडेवाढीचा सामना करावा लागेल. यामुळे सलग दोन वेळा दिलेल्या एसी लोकलची सवलत रेल्वे बोर्ड कायम ठेवणार की भाडेवाढ करून मुंबईकरांना झटका देणार, यावर येत्या आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता आहे. यापूर्वी मुंबईतील पहिली मेट्रो घाटकोपर ते वर्सोवा या प्रवासासाठीही सवलतीचे दर ठेवण्यात आले होते. मात्र काही महिन्यांमध्ये सवलतची रद्द करून वाढीव दर आकारण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांना सुखकर सेवेची सवय लागेपर्यंत सवलतीचे दर दिले जाते. मात्र नंतर ही सवलत काढून घेतली जाते, असेच यातून समजते.

वाचा : एसी लोकल सुसाट…

- Advertisement -

एसी लोकलचा विस्तार विरारपर्यंत

गेल्यावर्षी नाताळच्या मुहूर्तावर चर्चगेट-बोरिवली या मार्गावर वातनुकूलित लोकल मार्गस्थ झाली. देशातील पहिल्या लोकलला प्रवासी प्रतिसाद लाभावा म्हणून रेल्वे बोर्डाने सवलतीच्या दरात तिकीट आकारण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या सहा महिन्यांपर्यंत या सुविधेचा लाभ घेत मुंबईकरांनी एसी लोकलला भरभरून प्रतिसाद दिला. दरम्यान, १ जानेवारीपासून एसी लोकलचा विस्तार विरारपर्यंत करण्यात आला. पहिल्या सवलतीची डेडलाईन दृष्टीक्षेपात येताच बोर्डात हालचालींनी वेग घेतला. अखेर २५ जून २०१८ रोजी भाडेवाढ स्थगित करून २५ डिसेंबर २०१८ पर्यंत सवलत देण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला होता. यामुळे २५ डिसेंबर रोजी ही सवलत रद्द करण्याचा निर्णय घेतल्यास गारेगार एसी लोकलमध्ये महागाईच्या झळा लागण्याची शक्यता आहे. बुधवार, १९ डिसेंबरपर्यंत एसी लोकल सवलत रद्द करायची की कायम ठेवायची याबाबत बोर्डातून कोणताच पत्रव्यवहार झाला नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाचा : मुंबईची एसी लोकल दिवसभरासाठी बंद!

- Advertisement -

सध्याचे तिकीटदर

सध्याचे तिकीटदर पाहिल्यात एसी लोकलचे ० ते १० किलोमीटरसाठी ६० रुपयांचे तिकीट आहे. या प्रवासी टप्प्यासाठी सात दिवसांचा पास २८५ रु. १५ दिवसांचा पास ४३० रु. आणि ३० दिवसांच्या पाससाठी ५७० रुपये आकारले जातात. तर २५ डिसेंबर २०१७ चर्चगेट ते बोरिवली (प्रवासी प्रतिसादासाठी तिकीट दराच्या सवलत सुरू), १ जानेवारी २०१८ चर्चगेट ते विरार (एसी लोकलचा विस्तार), २५ जून २०१८ भाडेवाढ (भाडेवाढीला स्थगिती, आणखी ६ महिने सवलत सुरू ठेवण्याच्या बोर्डाचे आदेश) आणि २५ डिसेंबर २०१८ (सवलतीची वर्षपूर्ती, भाडेवाढीबाबत निर्णय अपेक्षित) आहेत.

वाचा : एसी लोकलचा दरवाजा विरुद्ध दिशेने उघडल्याने प्रवाशांचा गोंधळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -