घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरMaratha Reservation: मराठा समाजाकडून ठिकठिकाणी पुन्हा आंदोलन; राज्यभरात परिस्थिती काय?

Maratha Reservation: मराठा समाजाकडून ठिकठिकाणी पुन्हा आंदोलन; राज्यभरात परिस्थिती काय?

Subscribe

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. आज पुन्हा मराठवाड्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू झालं आहे

मराठवाडा: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. आज पुन्हा मराठवाड्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू झालं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने, हे आंदोलन पुन्हा एकदा पेटले आहे. (Maratha Reservation Again protest by Maratha community Road block wheel jam what is the situation across the state)

बीड, जालना, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील एसटी बसेसवर याचा परिणाम झाला आहे. नांदेड, हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्यातील बससेवा सर्वाधिक प्रभावित झाली. मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांमध्ये शनिवार 3 हजार 300 बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या.

- Advertisement -

सर्वात जास्त बसफेऱ्या नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यात रद्द कराव्या लागल्या. नांदेड जिल्ह्यात 80 टक्के बसफेऱ्या बंद होत्या. धाराशिव जिल्ह्यातील केवळ 20 ते 30 टक्के बसफेऱ्याच सुरू होत्या. शनिवारी मराठवाड्यात दिवसभरात 3 हजार 300 बसफेऱ्या रद्द झाल्या. सुमारे 3 लाख किलोमीटरचा प्रवास होऊ शकला नाही.

पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर चक्काजाम

सातारा पुणे या मार्गावरून वाखरी चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू केल्यानं सातारा आणि पुणे मार्गावरून येणारी शेकडो वाहनं अडकून पडली आहेत. गोपाळपूर चौकात केलेल्या चक्का जाममुळे मंगळवेढा आणि कर्नाटकमधून येणारी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. याशिवाय कासेगाव येथे सुरू असलेल्या, चक्काजाममुळे कोल्हापूर आणि कोकणातून येणारी वाहतूक थांबली आहे.

- Advertisement -

नाशिक- मुंबई महामार्गावर रास्ता रोको

नाशिक-मुंबई महामार्गावर आडगावाजवळ सकल मराठा समाजाच्यावतीने रास्तारोको आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. नाशिकचे मराठा कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच नाशिक-मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

हिंगोलीत बसफेऱ्या रद्द

हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रास्तारोको आंदोलन सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रशासनाच्यावतीने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप आंदोलकांनी केला आहे.
मराठा समाजाच्या आंदोलनामुळे 500 हून अधिक बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा: Rahul Gandhi: राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा अर्धवट सोडून तत्काळ वायनाडला रवाना; ‘हे’ आहे कारण)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -