घरक्राइम'सैराट'मधील सूरज पवार ऊर्फ 'प्रिन्स दादा'ला अटक होण्याची शक्यता, नेमके प्रकरण काय?

‘सैराट’मधील सूरज पवार ऊर्फ ‘प्रिन्स दादा’ला अटक होण्याची शक्यता, नेमके प्रकरण काय?

Subscribe

अहमदनगर जिल्ह्यात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे. याच प्रकरणात अभिनेता सुरज पवार याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक देखील करण्यात आली आहे.

प्रसिद्ध दिगदर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपट लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. अनेकांनी हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहण्यास पसंती दर्शवली होती. या चित्रपटातील पर्शा आणि आर्ची यांच्या जोडीने देशभरातील चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. याच चित्रपटातील आर्चीच्या भावाची भुमिका साकारणारा सुरज पवार उर्फ ‘प्रिन्स दादा’ सध्या चर्चेत आला. एका फसवणुकीच्या प्रकरणात सुरजचे नाव आल्याचे समजते. (marathi movie sairat fame actor suraj pawar involved in cheating with the lure of job at ahmednagar)

अहमदनगर जिल्ह्यात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे. याच प्रकरणात अभिनेता सुरज पवार याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक देखील करण्यात आली आहे.

- Advertisement -

दत्तात्रय क्षिरसागर, आकाश शिंदे, ओमकार तरटे अशी या तिघांची नावे आहेत. दत्तात्रय हा नाशिकचा रहिवाशी आहे. तसेच, आकाश आणि ओमकार हे दोघेही संगमनेरचे रहिवाशी असल्याची माहिती मिळते. या टोळकीने मंत्रालयात नोकरीला लावण्यासाठी 5 लाख रूपयांची मागणी केल्याचे समजते. या प्रकरणी नेवासा तालुक्यातील महेश वाघडकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या या तिघांची पोलिसांनी चौकशी केली असता, या प्रकरणात अभिनेता सुरज पवार याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणी आता सुरज पवार याला देखील अटक करण्यात येणार असल्याची माहिती मिळते.

- Advertisement -

हेही वाचा – वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्यामागे ३ व्यक्ती जबाबदार, शिरसाटांकडून नावं जाहीर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -