घरताज्या घडामोडीवेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्यामागे ३ व्यक्ती जबाबदार, शिरसाटांकडून नावं जाहीर

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्यामागे ३ व्यक्ती जबाबदार, शिरसाटांकडून नावं जाहीर

Subscribe

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाला सुरूवात झाली आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्यामागे ३ व्यक्ती जबाबदार असल्याचं म्हणत शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी थेट नावे जाहीर केली आहेत. सदर प्रकल्प खराब पाय असणाऱ्या मागच्या सरकारमुळे गुजरातमध्ये गेला, असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे.

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्यामागे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई हेच जबाबदार आहेत, असं शिरसाट यांनी सांगितलं. तसेच मी नाराज नाही. परंतु माझ्याबाबत जर कुणी अशी अफवा पसरवत असेल तर मानहानीचा दावा ठोकणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, मंत्रिपद किंवा काहीही मिळालं नाही तरी, मी शिंदे गटातच राहणार असून मी एक सच्चा कार्यकर्ता असल्याचं संजय शिरसाट यांनी यावेळी स्पष्ट केलं.

वेदांता प्रकल्प गुजरातला जाणे हे दुर्दैव – शरद पवार

- Advertisement -

फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणं हे दुर्दैवी आहे, यावर त्यापेक्षा आणखी मोठा प्रकल्प आणण्याचे आमिष म्हणजे रडणाऱ्या मुलाची समजूत काढण्यासारखे आहे. यावर आता चर्चा करण्यात काही अर्थ नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असा मोठा प्रकल्प दिला, तर त्याचे स्वागतच आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली.


हेही वाचा : केजरीवाल सरकार तब्बल 70 लाख बाटल्यांतील दारू फेकणार; वाचा नेमके कारण काय?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -