घरमहाराष्ट्रभिवंडीत यंत्रमाग कारखान्याला मध्यरात्री भीषण आग, सामुग्री जळून खाक

भिवंडीत यंत्रमाग कारखान्याला मध्यरात्री भीषण आग, सामुग्री जळून खाक

Subscribe

भिवंडी – भिवंडीतील यंत्रमाग कारखाना मध्यरात्रीच्या सुमारास आगीत भस्मसात झाल्याची माहिती समोर येत आहे. या आगीमुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली असून कच्चे कापड आणि यंत्रमाग जळून खाक झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याने परिसरात गोंधळ निर्माण झाला होता.

भिवंडीत देवजीनगर परिसरातील ए.डी,टेक्सटाईन नावाच्या यंत्रमाग कारखान्याला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. हा यंत्रमाग कारखाना दाटीवाटीच्या परिसरात असल्याने आगीची माहिती मिळताच लोकांमध्ये गोंधल निर्माण झाला. या आगीचे लोळ उंचावरूनही दिसत होते. त्यामुळे दाटीवाटीच्या परिसरात ही आग तात्काळ पसरू शकत होती. परंतु, अग्निशमन दलाने वेळेत आग विझवण्याचे कार्य सुरू केल्याने आग पसरू शकली नाही. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल होत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आग इतकी भीषण होती की आगीवर संपूर्ण नियंत्रण मिळवायला तब्बल तीन तास लागले.

- Advertisement -

कापड कारखान्यात लागलेल्या या आगीमागचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात अनेक कारखाने आहे. यंत्रमाग कारखान्यासह इतर वस्तूंचेही कारखाने मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे येथे सातत्याने आगी लागण्याच्या घटना घडत असतात. आगीची दहशतीखालीच येथील नागरिक येथे वास्तव्य करतात. परंतु, या आगी कशामुळे लागतात याची कारणे समोर येत नाहीत. त्यामुळे आग लागण्यामागची कारणं काय आहेत, याचा शोध घेतला पाहिजे, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -