घरमहाराष्ट्रवैद्यकीय पदवीपूर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र लवकरच

वैद्यकीय पदवीपूर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र लवकरच

Subscribe

आरोग्य शिक्षणाचे पदवीपूर्व विद्यार्थ्यांचे पुढील वर्षाचे शैक्षणिक सत्रास लवकरच प्रारंभ केला जाणार आहे. मात्र कधी प्रारंभ होणार हे अद्याप आरोग्य विद्यापीठाने जाहीर केलेले नाही.

आरोग्य शिक्षणाचे पदवीपूर्व विद्यार्थ्यांचे पुढील वर्षाचे शैक्षणिक सत्रास लवकरच प्रारंभ केला जाणार आहे. मात्र कधी प्रारंभ होणार हे अद्याप आरोग्य विद्यापीठाने जाहीर केलेले नाही.

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी मंगळवारी ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे पुढील वर्षाचे शैक्षणिक सत्राबाबत विचारविनीमय व सवितस्तर चर्चा करण्यात आली. आरोग्य शिक्षणातील विद्यार्थ्यांचे पुढील वर्षाचे शैक्षणिक सत्र सुरु करण्यात यावे. विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शक्य नसल्यास ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने वर्ग घ्यावे, याबाबत विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांना सूचीत करण्यात यावे असे निर्देश देशमुख यांनी दिले. कोरोनाचा प्रादुर्भाव पहाता तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी सष्ट केले आहे. माध्यमांना माहिती देताना मात्र विद्यापीठाने अद्याप नेमके कधी सत्र सुरु होणार हे स्पष्ट केलेले नाही. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासंदर्भात लवकरच माहिती दिली जाईल असे सांगितले आहे.

- Advertisement -

या बैठकीला विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, प्र-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, आयुष विभागाचे संचालक वैद्य कुलदीप राज कोहली, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -