‘रेल्वे’पिडिया आता ऑनलाईन मोडमध्ये

आता घरबसल्या रेल्वेचा अभ्यास करता येणार आहे.

central railway launched new website for railway employees and students
'रेल्वे'पिडिया आता ऑनलाईन मोडमध्ये

गेल्या साडेतीन महिन्यापासून कोरोनामुळे रेल्वे प्रवासी वाहतूक ठप्प आहेत. मात्र रेल्वेचे नवनवीन उपक्रम थांबले नाहीत. रेल्वेने लॉकडाऊनच्या काळात कोरोनाशी दोन हात करण्याकरिता मध्य रेल्वेने रोबोटची निर्मिती तर सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरक्षेसाठी अनेक उपयोजना केल्या आहेत. मात्र मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने एक नवीन उपक्रम सुरू करत रेल्वे कर्मचारी आणि सामान्य नागरिकांच्या ज्ञानात भर घालण्याकरिता एक वेबसाईट विकसित केली आहे. ज्यात अभ्यासाचे साहित्य, व्हिडिओ, परिपत्रके, कोड्स , मॅन्युअल, अहवाल, प्रश्न बँक, प्रबंध इत्यादी संदर्भासाठी अपलोड केले जात आहे. सुमारे ५४० पुस्तके, अभ्यासाचे साहित्य आणि सुमारे १०० व्हिडिओ, महत्त्वाच्या वेबसाईट लिंक अपलोड केल्या गेल्या आहेत. त्यामुळे आता सर्वांना घरी बसून रेल्वे संदर्भात मनसोक्त अभ्यास करता येणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात शाळा, महाविद्यालय बंद आहेत. तसेच खासगी आणि सरकारी खात्यातील ग्रंथालय सुध्दा बंद आहेत. त्यामुळे अनेकांचा अभ्यास थांबला आहे. मात्र भारतीय रेल्वेने आपल्या कर्मचार्‍यांसाठी आणि रेल्वे प्रेमी नागरिकांसाठी एक भन्नाट शक्कल लढवली आहे. मध्य रेल्वे पुणे विभाग यांनी एक वेबसाईट विकसित केली आहे. ज्यात अभ्यासाचे साहित्य, व्हिडिओ, परिपत्रके, कोड्स , मॅन्युअल, अहवाल, प्रश्न बँक, प्रबंध इत्यादी संदर्भासाठी अपलोड केले जात आहेत. सुमारे ५४० पुस्तके, अभ्यासाचे साहित्य आणि सुमारे १०० व्हिडिओ, महत्त्वाचे वेबसाइट लिंक अपलोड केले गेले आहेत आणि मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली (ह्युमन रिसोर्स मनेजमेंट सिस्टम) लिंक प्रदान केल्या आहेत. जेथे पुणे विभागाचे मानव संसाधन (एचआर) डिजीटलायझेशन उपलब्ध आहे. येथे ऑनलाईन प्रशिक्षण लिंक्स देण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे कोणीही ऑनलाइन व्याख्याने देऊ शकेल आणि प्रत्येकास ते पाहता येईल. कार्मिक शाखेच्या कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकार्‍यांच्या टिममुळे हे शक्य झाले आहे. जे या प्रयत्नात निरंतर मदत करीत आहेत. वेबसाईटची लिंक WWW.IROT.IM ही आहे.

विद्यार्थ्यांना होणार फायदा

रेल्वे परिक्षाची तयारी करणार्‍या विद्यार्थांना या वेबसाईटच्या मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. कारण रेल्वेचे अनेक अहवाल या वेबसाईटवर देण्यात आले आहे. तसेच रेल्वे संबंधीत माहिती संंबंधीत तंज्ञाचे व्हिडिओ अपलोड केले आहेत. यापूर्वी विद्यार्थ्यांना रेल्वेच्या अभ्यासासाठी पुस्तके ग्रंथालयातून घ्यावीत लागत होती किंवा ते फक्त रेल्वे ग्रंथालयातच उपलब्ध असायची. त्यामुळे अनेक अडचणी विद्यार्थ्यांना येत होत्या. मात्र या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे आता सोपे झाले आहे. त्यामुळे या वेबसाईटचा फायदा विद्यार्थी वर्गाला मोठया प्रमाणात होणार आहे.

रेल्वे कर्मचार्‍यांना सोयीस्कर

रेल्वे काम करणारे अनेक कर्मचार्‍यांना या वेबसाईटचा फायदा होणार आहे. कारण यात प्रक्षिणासाठी ऑनलाईन प्रशिक्षण लिंक्स देण्यात आले आहे. त्याप्रमाणे रेल्वे कर्मचारी तंज्ञ व्यक्तीचे व्याख्याने बघू शकणार आहेत. तसेच कर्मचारी सुध्दा व्याख्याने देऊ शकणार आहेत. इतकेच नव्हेतर रेल्वे कर्मचार्‍यांना रेल्वेचा विभागीय परिक्षेच्या तयारीसाठी या वेबसाईटचा मोठा फायदा होणार आहे.

पुणे विभाग यांनी एक वेबसाईट विकसित केली आहे. ज्यात अभ्यासाचे साहित्य,  व्हिडिओ,  परिपत्रके, कोड्स , मॅन्युअल, अहवाल, प्रश्न बँक, प्रबंध  इत्यादी  संदर्भांसाठी अपलोड केले आहेत. यांच्या फायदा सर्वसामान्य नागरिकांसोबतच रेल्वे कर्मचार्‍यांना सुध्दा होणार आहे. – शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे