संतापजनक! ‘तुला कोरोना झाला आहे’ म्हणत अल्पवयीन मुलीचा विनयभंग!

teacher molested more than 14 students in navi mumbai

लॉकडाऊनमध्ये अकोले तालुक्यात खानापूर शिवारात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका एका तरूणाने अल्पवयीन मुलीची छेड काढली आहे. या प्रकरणी अकोले पोलिस ठाण्यात विनयभंग व पोक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजिंक्य दामोदर मालुंजकर (वय-२३) असं या तरूणाचं नाव आहे. पोलीसांनी अजिंक्यला अटक केली आहे.

खानापूर शिवारात एक १२ वर्षाची मुलगी रानात शेळ्या चारण्यासाठी घेऊन गेली होती. त्यानंतर ती रस्त्याने घरी येत असताना अजिंक्य मालुंजकर हा त्याच रस्त्याने जात होता. त्याने वाहन थांबवून पीडित मुलीस गाडीवर बसण्यास सांगितले. मुलीने नकार दिला असता तो म्हणाला की, तुला करोना झाला आहे. तुला तुझ्या घरी सोडतो. आपल्याला कोरोना झालाय या भीतीने मुलगी त्याच्या गाडीवर बसली.

पुढे अजिंक्य तीला उसाच्या शेतात घेऊन गेला. तुला करोना झाला आहे. असे म्हणत या तरुणाने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलीने स्वत:ची सुटका करीत थेट घर गाठलं. तेथे गेल्यानंतर हा प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी पोलीसात जाऊन तक्रार दाखल केली.

पोलिसांनी काही फोटो पीडित मुलीस दाखविले असता अजिंक्यची ओळख पटली. त्यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस उप अधीक्षक रोशन पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिपक ढोमणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. अकोले पोलीस ठाण्यात विनयभंग व पोक्सो नुसार संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हे ही वाचा – धक्कादायक! विवाहित महिलेवर रेशन दुकानदाराने केला बलात्कार!