घरताज्या घडामोडीवैद्यकीय प्रवेशाच्या ७०।३० प्रक्रिया रद्द करण्यासाठी आमदार आक्रमक

वैद्यकीय प्रवेशाच्या ७०।३० प्रक्रिया रद्द करण्यासाठी आमदार आक्रमक

Subscribe

राज्य सरकार न्यायलयात सकारात्मक भूमिका मांडणार

राज्यातील उर्वारित महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या ७०।३० ही कोटा पद्धत रद्द करा, अशी आग्रही मागणी मंगळवारी विधानसभेत आमदारांनी केली. या मागणीसाठी विदर्भातील आमदारांनी आक्रमक पवित्रा धारण करीत न्यायालयात असलेली याचिका मागे घेण्याची देखील तयारी दर्शविली. दरम्यान, याप्रकरणी विशेष बैठक बोलवित मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केली. तर याप्रकरणी न्यायालयात देखील राज्य सरकार सकारात्मक भूमिका मांडेल, असे देखील देशमुख यांनी यावेळी जाहीर केले.

राज्यातील उर्वरित महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भ येथील वैद्यकीय महाविद्यालयात विभागनिहाय ७०।३० ही प्रवेश पद्धत राबविली जाते. १९८८ पासून ही पद्धत राबविण्यात आली असून या पध्दतीनुसार ज्या विभागातील विद्यार्थी असेल त्या विभागातील महाविद्यालयांमध्ये ७० टक्के कोटा व उर्वरित २ विभागातील महाविद्यालयामध्ये ३० टक्के गुणवत्तेनुसार प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेमुळे स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागत असल्याने ही पद्धत रद्द करण्याच्या मागणीसाठी आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी मंगळवारी लक्षवेधी सूचना मांडली होती. या सूचनेला उत्तर देताना वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी वरील माहिती दिली.

- Advertisement -

हेही वाचा – करोनाचे सावट, मुंबईत हॅण्ड सॅनिटायजरचा तुटवडा


दरम्यान, सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यासंदर्भात अधिक भाष्य करण्यास अमित देशमुख यांनी नकार दिला. पण राज्य सरकार यासंदर्भात न्यायालयात सकारत्मक भूमिका मांडेल, असे उत्तर त्यांनी दिले. मात्र या उत्तराने समाधान न झाल्याने आमदार राहुल पाटील यांच्यासह विदर्भ मराठवाड्यातील आमदारांनी आक्रमक पवित्रा धारण केला. राज्य सरकारने ७०।३० ची पध्दत रद्द केल्यास न्यायालयात ज्या याचिका आहेत. ते मागे घेण्यात येईल, असे सांगत त्यांनी याबाबत अंतिम तोडगा काढण्याचा मागणी आमदारांनी केली. मात्र, सकारात्मक उत्तर न मिळाल्याने आमदारांनी आक्रमक पवित्रा धारण केल्याचे चित्र सभागृहात दिसले. तत्पूर्वी सन २०१९ मधील तिन्ही प्रादेशिक विभागतील ३० टक्के राज्यस्तरीय कोट्यातील प्रवेशाचा एकत्रित विचार करता उर्वरित महाराष्ट्रातील ४०३, विदर्भातील ४९० आणि मराठवड्यातील ६८३ विद्यार्थ्यांना प्रवेश प्राप्त झाले असल्याची माहिती यावेळी लेखी उत्तरात दिली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -