घरUncategorizedकरोनाचे सावट, मुंबईत हॅण्ड सॅनिटायजरचा तुटवडा

करोनाचे सावट, मुंबईत हॅण्ड सॅनिटायजरचा तुटवडा

Subscribe

करोनाच्या प्रतिबंधासाठी जागतिक आरोग्य संघटनेने सातत्याने हात स्वच्छ करण्याचा सल्ला दिला आहे.

मुंबईत करोना व्हायरसच्या एलर्टमुळे एक वेगळाच तुटवडा निर्माण झाल्याचे पहायला मिळाले आहे. मुंबईत हॅण्ड सॅनिटायजरचा तुटवडा निर्माण झाला आहे. करोना व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी हॅण्ड सॅनिटायजरला पसंती मिळत असल्यानेच मुंबईतील शहर तसेच उपनगरातील दुकानांमध्ये हॅण्ड सॅनिटायजर उपलब्ध होत नसल्याचे आढळले आहे. करोन व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने लोकांना सातत्याने हात धुण्याचा सल्ला दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर लोकांकडून साबण, अल्कोहोल बेस सॅनिटायजर आणि पाणी या तीन गोष्टींचा मोठा वापर पहायला मिळत आहे. संपुर्ण दिवसभरात आपल्यासोबत संसर्ग झालेल्या गोष्टींचा नायनाट करण्यााठी सातत्याने हात धुणे हा उत्तम पर्याय असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.

येत्या १० ते १५ दिवसांपर्यंत हा शॉर्टेज असेल असे महाराष्ट्र केमिस्ट एण्ड ड्रगिस्ट असोसिएशनकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील अनेक दुकांनांमध्ये ब्रॅण्डेड अशा कंपन्यांचे हॅण्ड सॅनिटायजर उपलब्ध होणार नाहीत असेही ते म्हणाले. करोना व्हायरसच्या भीतीमुळे लोकांमध्ये चिंतेचेवातावरण आहे. त्यामुळे शाळकरी मुलांपासून ते मोठ्या वयोगटातील सर्वच हे हॅण्ड सॅनिटायजरचा सर्रास वापर करत आहेत.

- Advertisement -

असे स्वच्छ करा हात

१ वाहत्या नळाच्या पाण्यासोबत तुमचे हात ओले करा, त्यानंतर हाताला साबण लावा
२ तुमच्या हाताला लागलेला साबण हा तुमच्या बोटांवर, नखांमध्ये, बोटांमध्ये व्यवस्थित चोळा, महत्वाच म्हणजे तुमची नखं कमी करा
३ तुमचा हात जवळपास २० सेकंदापर्यंत साबणाने किंवा हॅण्ड सॅनिटायजरने चोळा
४ स्वच्छ पाण्याखाली तुमचा हात काही वेळ धुवा
५ स्वच्छ टॉवेलचा वापर करून तुमचा हात कोरडा करा, त्यानंतर तो टॉवेल सुकवण्यासाठी ठेवा

hand washing
असे करा हात स्वच्छ

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -