Thursday, March 4, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र भाजपला दुसरा धक्का; अपक्ष आमदार गीता जैन शिवसेनेत प्रवेश करणार

भाजपला दुसरा धक्का; अपक्ष आमदार गीता जैन शिवसेनेत प्रवेश करणार

Related Story

- Advertisement -

मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन उदया शनिवारी दुपारी १२ वाजता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर गीता जैन यांचा प्रवेश होणार आहे. गीता जैन यांच्या पक्ष प्रवेशाने मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे.

मीरा भाईंदर महापालिकेतील काही भाजप नगरसेवकही जैन यांच्या संपर्कात आहेत. मात्र सध्या जैन एकट्याच प्रवेश करणार आहेत. भाजपच्या माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका असलेल्या जैन यांनी तत्कालीन भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी मतभेद झाल्याने बंडखोरी करत २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक लढवून भाजपच्या नरेंद्र मेहता यांचा पराभव केला होता. दरम्यान, शनिवारी गीता जैन शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे भाजपला धक्का बसला आहे. खडसेंपाठोपाठ आता गीता जैन शिवसेनेत जाणार असल्यामुळे भाजपला दुहेरी धक्का बसणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -