घरताज्या घडामोडीआता तरी सुधरा, मनसेचा अल्टीमेटम

आता तरी सुधरा, मनसेचा अल्टीमेटम

Subscribe

शासकीय लसीकरण केंद्रावर झालेल्या बॅनरबाजीमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी अनेक ठिकाणी सत्याग्रहाचा मार्ग स्विकारून ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. तरीही अनेक ठिकाणी असे प्रकार सुरू असल्याने मनसेच्या वतीने या प्रकारांबाबत अल्टीमेटम दिला आहे. राजकीय बॅनर्सची जाहिरातबाजी हा उबग असणारा प्रकार आहे. त्यामुळे हा प्रकार सत्ताधारी पक्षांनी टाळायला हवा अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. जाहिरतबाजीचे अनेक प्रकार मनसैनिकांनी उघडकीस आणले आहेत. पण ही आंदोलनाची वेळ नव्हे असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सत्याग्रहाच्या मार्गाने आतापर्यंत हे प्रकार मनसैनिक उघडकीस आणत आहेत, यापुढच्या काळातही हे प्रकार उघडकीस आणले जाणार आहेत, असे मनसेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबतचे एक निवेदन मनसेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

शासकीय लसीकरण केंद्रांवरची राजकीय जाहिरातबाजी थांबवा!

#लढाकोरोनाशी #महाराष्ट्र_प्रथम

Posted by MNS Adhikrut on Saturday, May 22, 2021

- Advertisement -

 

राजकीय पोस्टरबाजीवर मनसेचा अल्टीमेटम काय ?

शासकीय लसीकरण केंद्रावर काही राजकीय पक्षांनी स्वतःचे फलक लावून जाहीरातबाजी सुरू केली आहे. मुळात लशीच्या तुटवड्यामुळे नागरिक त्रस्त आहेत आणि त्यात शासनाच्या खर्चामुळे चालणाऱ्या केंद्रावर राजकीय बॅनर्सची जाहिरातबाजी, हा उबग आणणारा प्रकार आहे. आणि हा प्रकार सत्ताधारी पक्षांनी तर टाळायलाच हवा कारण योग्य पायंडा पाडायची जबाबदारी तुमची आहे हे विसरू नका.

- Advertisement -

जाहिरातबाजीचे हे प्रकार अनेक ठिकाणी महाराष्ट्र सैनिकांनी उघडकीस आणलेत, अर्थात ही आंदोलनाची वेळ नाही, त्यामुळे महाराष्ट्र सैनिक सत्याग्रहाचा मार्ग स्विकारून ह्या बाबी उघडकीस आणत आहेत आणि तसंच पुढे देखील करतील…. पण सत्ताधारी पक्षांनी बोध घेऊन स्वतःची कृती सुधारावी हीच आमची रास्त अपेक्षा.

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -