घरमहाराष्ट्रनाशिकयंदाच्या विधानसभेत मनसे दोन आकडी जागा जिंकणार

यंदाच्या विधानसभेत मनसे दोन आकडी जागा जिंकणार

Subscribe

आगामी विधानसभेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांना प्रचंड यश मिळून मनसेचे दोन आकडी आमदार निवडून येतील, असे भाकीत नाशिकमध्ये सुरु असलेल्या ज्योतिष संमेलनात करण्यात आले आहे.

सध्या नाशिकमध्ये ज्योतिष संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात राज ठाकरे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत चांगला फायदा होईल, असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. ‘मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्रिकेतील गुरु पुन्हा धनु राशीत येत असल्यामुळे मनसे पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीत दोन आकडी जागा जिंकता येणार आहे’, असे महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मारटकर म्हणाले आहेत.

काय आहे नेमकं भाकीत?

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात राज ठाकरे उतरले जरी नसले तरी प्रचाराच्या रणशिंगणात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्राभरात सभा घेतल्या होत्या. या सभांचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत नक्की होऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्रात युतीला मोठा फटका बसून शिवसेनेच्या जागा हातातून निसटू शकतात. दरम्यान, ‘राज ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हातमिळावणी करुन मनसे विधानसभा निवडणूक लढवेल. या निवडणुकीत मनसेला लोकांचा भरभरुन प्रतिसाद मिळेल आणि मनसेचे दोन अंकी आमदार निवडून येतील’, असे भाकीत सिद्धेश्वर मारटकर यांनी वर्तवले आहे.

- Advertisement -

‘भाजपला जागा कमी, मात्र मोदीच पंतप्रधान’

यासोबतच सिद्धेश्वर मारटकर यांनी दावा केला आहे की, ‘या लोकसभा निवडणुकीत भाजपला जागा कमी मिळतील. मात्र, पंतप्रधान मोदीच बनतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींची वृश्चिक रास असून सध्या त्यांच्या राशीतून गुरुचे भ्रमण होत असल्याने त्याचा मोदींना फायदा होणार आहे.’

अंनिसचा ज्योतिष संमेलनावर आक्षेप

ज्योतिष संमेलनात केले गेलेले भाकीत कितपत खरे आहे, याची शाश्वती देता येणार नाही. शिवाय, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील याअगोदर या संमेलनावर आक्षेप घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -