घरमहाराष्ट्रअतिमहत्त्वाचे काम असेल तरच २२ ऑगस्टला घराबाहेर पडा; अभिजीत पानसेंचा मनसे इशारा

अतिमहत्त्वाचे काम असेल तरच २२ ऑगस्टला घराबाहेर पडा; अभिजीत पानसेंचा मनसे इशारा

Subscribe

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावून २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना अभिजीत पानसे यांनी २२ ऑगस्ट रोजी काय होईल? ते माहीत नाही. पण २२ ऑगस्टला अतिमहत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा, असा सूचक इशारा दिला आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर त्याला सरकार जबाबदार असेल, असेही पानसे म्हणाले आहेत.

ईडी आणि आयकर विभाग हे भाजपचे कार्यकर्ते झाले आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांशी कसे लढायचे हे मनसेला चांगलेच माहीत आहे. त्याप्रमाणे आम्ही लढा देऊ. – संदिप देशपांडे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -