घरमहाराष्ट्रनाशिकसंगमनेरमध्ये नव्याने सापडले सर्वाधिक तेरा बाधित

संगमनेरमध्ये नव्याने सापडले सर्वाधिक तेरा बाधित

Subscribe

कुरण गाव बनतेय कोरोनाचे हॉटस्पाॅट

संगमनेर : शनिवार संगमनेरकरांसाठी धोकादायक ठरला आहे. संगमनेरमध्ये तब्बल तेरा नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले. यात शहरातील तीन तर तालुक्यातील दहा रुग्णांचा समावेश आहे. यातील आठ रुग्ण कुरण गावातील असल्याने हे गाव कोरोनाचे हाॅटस्पॉट म्हणून पुढे येत आहे. आतापर्यंत कुरणमध्ये सोळा रुग्ण आढळले असून हे गाव प्रशासनालादेखील सहकार्य करत नसल्याचे समोर येत आहे.

संगमनेरची कोरोना स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. एकट्या संगमनेर तालुक्यात आत्तापर्यत नगरपाठाेपाठ रुग्ण आढळून आले आहे. संगमनेरातील रुग्णसंख्या १२७ च्या घरात गेली आहे. तर आत्तापर्यत ११ जणांचा कोरोनाने मृत्यु झाला. तालुक्यात कोरोनाचे संक्रमण धक्कादायकरित्या वाढत आहे. आत्तापर्यतचा रुग्ण संख्येचा विक्रमदेखील आज १३ रुग्णांमुळे मोडीत निघाला. संगमनेर तालुक्यातील कुरणमध्ये शनिवारी आठ रुग्ण आढळले, आत्तापर्यत येथे आठ रुग्ण आढळले आहेत. त्यात आणखी आठ जणांची भर पडली. तर याच गावातील ८५ वर्षाची वृध्दा कोरोनावर मात करुन शनिवारी घरी परतली आहे.

- Advertisement -

कुरणपाठोपाठ दोन रुग्ण शहरामध्ये आढळले आहेत. यात रहेमतनगर, श्रमिकनगरमधील रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय बाधित आढळलेल्या अन्य तीन जणांत विठ्ठलनगर (गुंजाळवाडी), घुलेवाडी आणि संगमनेर खुर्द येथील रुग्णांचा समावेश आहे. हे रुग्ण शहर हद्दीच्या सीमेवरील लगतच्या गावामधील असल्याने आता शहरालगतही कोरोनाने डोके वर काढले आहे.

जिल्ह्यात २६ नवे बाधित

संगमनेर आणि नगरची कोरोना पाठ सोडायला तयार नाही. अन्य तालुक्यांच्या तुलनेत या दोन तालुक्यामध्ये रुग्णसंख्येचा विक्रम नोंदविला गेला आहे. नगरमध्ये दीडशेच्या घरात तर संगमनेरमध्ये सव्वाशेच्या आसपास रुग्ण आढळले आहेत. शनिवारी दुपारी आलेल्या अहवालामध्ये जिल्ह्यात २६ रुग्ण आढळले. यात संगमनेरमध्ये १३, नगर शहरात ८, अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे आधीच्या रुग्णाच्या संपर्कातील दोघांना कोरोनाची लागण झाली. आणि कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील कारंजा चौक व धारणगाव येथील दवंडे मामा वस्ती येथे एकेक रुग्ण आढळले आहेत. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५७० वर गेली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -