घरताज्या घडामोडीराज्यसभेत संभाजीराजेंचा आवाज झाली शिवसेना, अन्...

राज्यसभेत संभाजीराजेंचा आवाज झाली शिवसेना, अन्…

Subscribe

लोकसभेत १२७ व्या घटनादुरूस्तीला बहुमताने मंजूर करण्यात आले. त्यानंतर हे घटनादुरूस्ती विधेयक हे राज्यसभेत चर्चेसाठी आले. या १२७ व्या घटना दुरूस्तीच्या चर्चेच्या निमित्ताने अनेक राजकीय पक्षांनी आज आपले म्हणणे मांडले. त्याचवेळी महाराष्ट्रातील खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही आपल्याला या घटनादुरूस्तीच्या विधेयकाच्या निमित्ताने बाजू मांडायची संधी मिळावी म्हणून मागणी केली. पण त्यावेळी पिठासिन अध्यक्षांनी त्यांना बोलण्यासाठीची मंजुरी अध्यक्षांनी दिली नसल्याचे सांगितले. पण शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे त्यावेळी संभाजीराजेंच्या मदतीला धावून आले. संजय राऊतांनी संभाजी राजेंना बोलू द्यावे म्हणून मागणी लावून धरली. त्यावेळी दोन मिनिटांचा वेळ हा संभाजी राजे यांना देण्यात आला. संभाजी राजे यांनी दोन मिनिटांच्या कालावधीत या विधेयकाच्या निमित्ताने आरक्षणाशी संबंधित दोन मुद्देही सुचवले.

- Advertisement -

काय म्हणाले

- Advertisement -

अवघ्या दोन मिनिटांच्या कालावधीत संभाजीराजे यांनी इंद्रा सहानी यांच्या प्रकरणातील आदेशाचा उल्लेख मांडला. अपवादात्मक परिस्थिती म्हणून सध्याची आरक्षणाची ५० टक्के मर्यादा ओलांडण्याची मर्यादा मिळण्याची गरजेची असल्याचे मत त्यांनी मांडले. त्यासाठीच राज्य सरकारला अधिकार देण्यात यावेत अशीही मागणी त्यांनी केली. ज्याठिकाणी दुर्गम भागातील परिस्थिती नाही अशा ठिकाणी समाजातील काही वर्ग मागास राहू शकतो या अनुषंगाने अपवादात्मक परिस्थिती दूरच्या आणि दुर्गम भागातील लोकांचा विचार ही अट काढून टाकावी अशीही मागणीही त्यांनी केली. ही परिस्थिती अपवादात्मक मानून राज्य सरकारला हा अधिकार देण्यात यावा अशीही मागणी त्यांनी केली.

अशी मिळाली २ मिनिटांसाठी बोलण्याची परवानगी

खासदार संभाजी राजे बोलायला उभे राहिले असतानाच खासदार संजय राऊत यांनी ते छत्रपतींचे वंशज आहेत. तसेच महाराष्ट्रातील विषयावर ते बोलणार आहेत, अशी मागणी लावून धरली. पण सुरूवातीला पिठासीन सभापतींनी त्यांना बोलण्यासाठी नकार दिला. पण राज्यसभेत सभागृहातील अनेक खासदारांकडून त्यांना बोलायला द्या अशी मागणी पुढे आली. त्यामुळेच संभाजी राजे यांना एकण्याची अनेक सदस्यांची मागणी आहे असे सांगत त्यांना परवानगी देण्यात आली.

घटनादुरुस्ती विधेयकावर संभाजीराजेंच्या दोन सुधारणा 

१. असाधारण परिस्थिती म्हणून केवळ दूरवर आणि दुर्गम भागातल्या लोकांचाच विचार ही अट काढून टाकावी
२. अपवादात्मक परिस्थितीत आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा वाढवावी


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -