शरद पवारांचे भाजपच्या टीकेला कवितेतून प्रत्युत्तर

MP Sharad Pawar criticized BJP
MP Sharad Pawar criticized BJP

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या भाषणातून भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, भाजप सरकार जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. आणीबाणीनंतर जनतेने इंदिरा गांधींचे सरकार पाडले होते. त्यानंतर मोरारजी देसाई यांचे सरकार जनतेनी पाडले. जनता सुजाण आहे. नेते चुकल्यावर त्यांना धडा शिकवते, असे म्हटले आहे.

महाराष्ट्र भाजपच्या ट्विटरवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पावर यांच्या साताऱ्यातील भाषणाचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला होता. यात शरद पवार यांनी हिंदू देवांचा कशाप्रकारे अपमान केला, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला होता. यावर शरद पवार यांनी जवाहर राठोड यांच्या कवितेचे वाचन केले. याच कविता वाचनावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र, पवारांनी आज वाचलेल्या कवितेच्या माध्यमातून कष्टकऱ्यांच्या वेदना मांडण्याचा प्रयत्न राठोड यांनी केला, असे म्हटले आहे.

दरम्यान भाजपकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये शरद पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात. नास्तिक शरद पवार यांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढलेत. पवारांनी हिंदूं धर्माची बदनामी केली नसती, जातीवाद केला नसता, देवीदेवतांचा अपमान केलाच नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते. पवारसाहेब या वयात आपल्याला शोभेल असेच वक्तव्य करा!, असे ट्विट करण्यात आले आहे. या टीकेला शरद पवारांकडून पुन्हा तीच कविता वाचून प्रत्युत्तर दिले असल्याचे बोलले जात आहे.