घरताज्या घडामोडीMPSC Exam 2021 : एमपीएससी पूर्वपरीक्षेत पेपरफुटीचा 'अभिविप' चा आरोप, आयोगाचा इन्कार

MPSC Exam 2021 : एमपीएससी पूर्वपरीक्षेत पेपरफुटीचा ‘अभिविप’ चा आरोप, आयोगाचा इन्कार

Subscribe

राज्य सेवा पूर्व परीक्षा (MPSC Exam) २०२१ च्या प्रश्नसंचाचा सील नियमबाह्य पद्धतीने नागपुरातील एका परीक्षा केंद्रावर फोडण्यात आल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केले आहे. पेपर फुटल्याचा आरोप करत अभिविपच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात आंदोलन केले. सकळी विद्यार्थी केंद्रावर येण्याआधीच हे पेपेरचे सील फोडल्याचा कार्यकर्त्यांचा दावा आहे. त्यानंतर अभिविपच्या कार्यकर्त्यांनी हा सगळा प्रकार पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला आहे. या प्रकरणात आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून कारवाई करत त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पण एमपीएससी आयोगाने मात्र पेपर फुटीचा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले आहे. (MPSC state service pre exam paper leak at Nagpur abvp agitation mpsc commission denied )

- Advertisement -

 

एकुण तीन संचापैकी एक प्रश्नपत्रिकेचा संच हा परीक्षा केंद्र प्रमुख आणि एका लिपिकाने आधीच फोडल्याचा अभिविपच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे. या घटनेनंतर कार्यकर्ते आंदोलनासाठी बसले आहेत. या दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचीही मागणीही कार्यकर्त्यांनी केली. तर या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार तिन्ही प्रश्नपत्रिका पेपर सुरू होईपर्यंत शाबहूत होत्या. पोलिसांकडून याबाबतची परिस्थिती पडताळून वास्तविक सत्य परिस्थिती अभिविपच्या कार्यकर्त्यांना दाखवण्याचा प्रयत्नही करण्यात आला.

- Advertisement -

MPSC आयोगाचा खुलासा 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मात्र अशा पद्धतीचा कोणताही पेपरफुटीचा प्रकार झाल्याचे वृत्त फेटाळले आहे. पेपरफुटीबाबत समाजमाध्यमांमध्ये देण्यात आलेले वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण आयोगाने दिले आहे. तसेच अशी कोणतीही घटना घडली नसल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ बाबतच्या समाजमाध्यमांवरील बातम्यांमध्ये कोणतीही सत्यता नाही, असेही आयोगाने म्हटले आहे.



 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -