घरमहाराष्ट्रमुरबाडच्या म्हसा यात्रेत लाखो भाविकांची अलोट गर्दी

मुरबाडच्या म्हसा यात्रेत लाखो भाविकांची अलोट गर्दी

Subscribe

आकाश पाळणे, मिठाई, खेळण्यांची दुकाने सजली , गुरांच्या खरेदी विक्रीसाठी बाजार भरला , बांबूच्या वस्तू विक्रीसाठी आदिवासी दाखल

महाराष्ट्रातील प्रसिध्द जत्रा उत्सव समजली जाणारी मुरबाड तालुक्यातील म्हसा यात्रेला सुरुवात झाली असून यात्रेसाठी अबाल वृद्ध, पुरुष, महिला आदी लाखो भाविकांनी एकच गर्दी केली आहे. दरवर्षी यात्रेकरूंच्या गर्दीचा उंच्चाक असणार्‍या या यात्रेसाठी मुरबाड तालुक्यासह शहापूर, कल्याण, ठाणे, रायगड, पालघर नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, तसेच कर्नाटकमधून भाविक खास करून म्हसा यात्रेला येतात.

या जत्रा उत्सवात दैनंदिन वापरातील वस्तूंची वेगवेगळी दुकाने सजतात. यात लहान मुलांसाठी खेळण्याची दुकाने, कपड्यांची दुकाने, मिठाईची दुकाने प्रामुख्याने म्हसा यात्रेतील हातोली जांभूळ खाजा ही मिठाई अत्यंत प्रसिध्द आहे. त्याचसोबत घोगंडी, ब्लँकेट, चादरी, भांडी, शेतीसाठी शेतकर्‍यांच्या उपयुक्त असणारे पंजा विळे, कोयते, कुर्‍हाड या वस्तू तसेच हस्त कौशल्याने तयार केलेल्या बांबूच्या टोपल्या, सुपे, बांबूच्या काठया देखील विक्रीसाठी ठेवल्या जातात. विशेष म्हणजे गुरांच्या खरेदी-विक्रीसाठी म्हसा यात्रेत शेतकरी मोठ्या प्रमाणावर येतात हजारोंच्या संख्येने येथे गुरांच्या विक्रीचा बाजार भरतो. म्हणून येथे

- Advertisement -

विस्तिर्ण माळावर पसरलेला गुरांचा बाजार तसेच शेती व गुरांसाठी लागणार्‍या साहित्य खरेदीसाठी ही यात्रा विशेष प्रसिद्ध आहे. एकंदरीत या यात्रेत दरवर्षी खरेदी विक्रीच्या व्यवहारातून लाखो रुपयांची उलाढाल होते.म्हसा यात्रेत शंकराचे देऊळ हे केंद्रस्थानी असते. या देवाला म्हसोबा असे नाव आहे. यात्रेचा पहिला दिवस म्हणजे तळी. या दिवशी शंकराची पूजा करून त्याला नवस बोलण्याची प्रथा आहे. काही लोक येथे मोठ्या श्रद्धेने नवस पूर्ण झाल्यावर केळी, मिठाई यांची तुला करून किंवा नारळाचे तोरण बांधून नवस फेडतात.

यात्रेकरूंच्या मनोरंजनासाठी म्हसा जत्रेत दरवर्षी आकाश पाळणे, जादूचे खेळ, मौत का कुआँ, अशी मनोरंजनाची साधनेही उपलब्ध आहेत. येथे संपूर्ण महाराष्ट्रातील तमाशा फड हजेरी लावतात. या पूर्वी वाहतुकीचे साधन नसल्याने लोकं बैलगाडी किंवा पायीच येत असत. आता परिवहन महामंडळाच्या बस उपलब्ध आहेत. म्हसा यात्रेसाठी एसटी महामंडळानी मुरबाड, शहापूर, कल्याण, नेरळ, कर्जत अशा ठिकाणावरून जादा एसटी बस सोडल्या आहेत. यामुळे यात्रेकरूंची सोय झाली असून एसटीने प्रवास करुन अनेक भाविक म्हसा येथे पोहचतात. तर काही खासगी वाहने घेऊन म्हसा जत्रेला हजेरी लावतात.

- Advertisement -

बांबूपासून बनवलेल्या टोपल्यांची विक्री
म्हसा यात्रेत खास बांबूपासून तयार करण्यात आलेल्या सुप, टोपल्यांची विक्री करण्यासाठी आदिवासी दाखल झाले आहेत. आदिवासी बांधवांनी आपल्या कलाकुसरीने बांबूपासून बनवलेल्या रंगीत टोपल्या, सुप, बांबूचे करंटे अशा अनेक वस्तू या यात्रेत विक्रीसाठी ठेवल्या आहेत. या बांबूच्या वस्तू यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -