घरदेश-विदेशMumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक एक महिन्यासाठी राहणार बंद

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक एक महिन्यासाठी राहणार बंद

Subscribe

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. येत्या काळात गोव्याला जाण्याचा बेत आखत असाल तर जरा थांबा. कारण मुंबई-गोवा महामार्ग एक महिन्यासाठी वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरी करणाचे काम रखडले आहे.

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. येत्या काळात गोव्याला जाण्याचा बेत आखत असाल तर जरा थांबा. कारण मुंबई-गोवा महामार्ग एक महिन्यासाठी वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरी करणाचे काम रखडले आहे. परिणामी, वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळं चिपळूण जवळील परशुराम घाटातील महामार्गाचे रुंदीकरणाचे काम करण्यात येणार असून, या कामासाठी जवळपास एक महिना महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामासाठी 22 एप्रिलपासून पुढील महिन्याभरासाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 5 या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. चिपळूण येथे झालेल्या स्थानिक प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

बुधवार 20 एप्रिलपासून या कामाची सुरूवात करण्यात येणार होती. परंतु, खेडमधील लोटे एमआयडीसीतील कंपन्यांकडून स्थानिक प्रशासनाकडे नियोजनासाठी दोन दिवसांची मुदत मागण्यात आली होती. त्यामुळं हे काम आता 22 एप्रिलपासून महिन्याभरासाठी परशुराम घाटात रुंदीकरणाचे काम सुरु राहणार आहे.

परशुराम घाटपरिसरात पर्यायी मार्गाबाबत पाहणी करण्यात आली आहे. तसंच वाहतूक पर्यायी मार्गे वळवताना वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी चार ठिकाणी पोलीस चौकी उभारली जाणार आहे. उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी चार दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती. त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

पर्यायी वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरु राहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. 22 एप्रिलपासून लहान वाहने, राज्य परिवहन मंडळाची वाहने आणि लोटे एमआयडीसीतील बसेसची वाहतूक ही लोटे-चिरणी-आंबडस मार्गे चिपळूण अशी सुरु ठेवण्यात येणार आहे. मात्र, याबाबत महामार्ग रुंदीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीकडून संबंधित वाहतूक 22 एप्रिल 2022 पासून बंद राहणार असल्याची माहिती हाती आली आहे.


हेही वाचा – जेव्हा सिटी सेंटर मॉलला लागते आग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -