घरमहाराष्ट्रसंजय राऊतांच्या ईडी अधिकाऱ्यांवरील आरोपांच्या तपासासाठी एसआयटी स्थापन; गृहमंत्र्यांची माहिती

संजय राऊतांच्या ईडी अधिकाऱ्यांवरील आरोपांच्या तपासासाठी एसआयटी स्थापन; गृहमंत्र्यांची माहिती

Subscribe

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना भाजप आणि ईडी अधिकाऱ्यांवर निशाणा साधला होता. त्यावेळी त्यांनी ईडीचे अधिकारी वसुली करत असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. त्यांच्या या आरोपानंतर आता या आरोपांचा तपास करण्यासाठी एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना भाजप आणि ईडी अधिकाऱ्यांवर निशाणा साधला होता. त्यावेळी त्यांनी ईडीचे अधिकारी वसुली करत असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. त्यांच्या या आरोपानंतर आता या आरोपांचा तपास करण्यासाठी एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आली आहे. यांसंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे. ‘मुंबई पोलीस या प्रकरणाच तापस करत आहेत. नुकतंच एसआयटी नेमण्यात आली असून, या प्रकरणासाठी एसआयटीला जितका वेळ लागेल तितका देण्यात येईल’ असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं.

ईडी अधिकारी खंडणी रॅकेट चालवत असलेल्या या संजय राऊतांच्या आरोपांचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या एसआयटीचं नेतृत्व अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) वीरेश प्रभू तपासाचे नेतृत्त्व करत असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. त्यांच्या नेतृत्त्वात या प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे.

- Advertisement -

काय म्हणाले होते संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना भाजप आणि ईडी अधिकाऱ्यांवर निशाणा साधला होता. त्यावेळी त्यांनी ईडीचे अधिकारी वसुली करत असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. तसेच संजय राऊतांनी जितेंद्र नवलानी यांच्यावरही आरोप केले होते. तेदेखील खंडणी वसुलीच्या कटात सहभागी असल्याचं सांगितलं होतं. तसंच, मुंबईतील केंद्रीय तपास यंत्रणांची कार्यालयं ही खंडणीखोर बनली असल्याची घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.

- Advertisement -

महाराष्ट्राला कसे लुटले, कोट्यवधींची अफरातफर केली याची सगळी माहिती उघड करणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं होतं. कुणाला आमच्या आंगावर यायचं असेल त्यांनी जरूर यावं. एक दिवस त्यांना या ठिकाणाहून तोंड काळं करून जावं लागेल. आम्ही लवकरच ट्रकच्या ट्रक ईडी ऑफिसवर घेऊन जाणार आहोत. तसेच, लवकरच ईडीचा सर्वात मोठा घोटाळा याचं ठिकाणी बसून बाहेर काढणार आहोत, असंही त्यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं होतं.

भडकावू भाषणं करून समाजा-समाजामध्ये संघर्ष

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या गुढीपाडव्याच्या भाषणात ‘मशिदींवरील भोंगे उतरवा, अन्यथा त्यांच्यासमोर भोंगे लावून मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावला जाईल’ असं वक्तव्य केलं होतं. यावरही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांनी राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर कारावाई होऊ शकते का असा प्रश्न विचारला त्यावर ‘यासंदर्भात तपास करून पुढील निर्णय घेण्यात येईल’, असं म्हटलं.

“अलिकडच्या काळामध्ये काही पक्षांच्या माध्यमातून भडकावू भाषणं करून समाजा-समाजामध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही बाब महाष्ट्र व देशाच्या एकतेच्यादृष्टीने बरोबर नसून, आम्ही यासंदर्भात लक्ष ठेवून आहोत”, असंही यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं.


हेही वाचा – देशात भाजपशासित राज्यात अजूनही भोंगे उतरले नाहीत, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -