घरमहाराष्ट्रमुंबई-पुणे हायवेवर दोन तासांचा रोड ब्लॉक

मुंबई-पुणे हायवेवर दोन तासांचा रोड ब्लॉक

Subscribe

मुंबई –पुणे एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करणाऱ्यांना ९ जुलै रोजी काही तासांचा ब्रेक लागणार आहे.

मुंबई –पुणे एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करणाऱ्यांना ९ जुलै रोजी काही तासांचा ब्रेक लागणार आहे. पुढील आठवड्यात मंगळवारी, दुपारी १२ ते २ या कालावधीत मुंबई-पुणे महामार्गावर रोड ब्लॉक असणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, पुणे यांच्यावतीने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रवास करणाऱ्या सर्व वाहन चालकांना आणि प्रवाशांना याबाबतची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ९ जुलै रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत पुणे लेनवर कि.मी. ६५.७०० या ठिकाणी ओव्हर हेड गँट्री बसवण्याचे कामकाज करण्यात येणार असून त्यामुळे या कालावधीत द्रुतगती मार्गावरील पुण्याकडे जाणारी वाहतूक दोन तासाकरता पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.

वाहतूक मार्गात बदल 

दरम्यान सर्व प्रकारची अवजड आणि माल वाहतूक करणारी वाहने द्रुतगती मार्गावरील खालापूर टोलनाका आणि कुसगांव टोलनाक्याचे पूर्वी कि.मी. ५२.५०० या ठिकाणी थांबवण्यात येणार आहेत. हलकी चारचाकी आणि इतर प्रवासी वाहने ही द्रुतगती मार्गावरील कुसगांव टोलनाका येथून जुना मुंबई-पुणे महामार्ग (एनएच-०४) पुण्याकडे वळवण्यात येणार आहेत. ही माहिती अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांच्यावतीने देण्यात आली आहे. तसेच प्रवाशांनी महामार्ग पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

म्हणून राजू शेट्टी राज ठाकरेंच्या भेटीला

खुशखबर..! बँकेच्या परीक्षा आता देता येणार मराठीमधून

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -