घरमहाराष्ट्रराज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय; चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय; चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका

Subscribe

मुंबईतील साकीनाका येथे एका टेम्पोत ३० वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना काल समोर आली होती. (Mumbai Sakina Rape case) या संतापजनक घटनेतील पीडितेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून कायद्याचा धाक राहिलेला नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या घटनांवरुन सरकारवर टीकास्त्र डागलं. “या आठवड्यातील महिलांवरील अत्याचाराची ही सहावी घटना आहे. महाराष्ट्र सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा. महिलांच्या शोषणाच्या प्रकरणांमध्ये महाविकास आघाडी सरकारशी संबंधित नेते आणि कार्यकर्त्यांची नावं पुढे येत आहेत. आघाडी सरकारचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर आरोप असतील तर पोलिसांवर दबाव टाकला जातो. मात्र, यांच्यावर कारवाई व्हायला हवी, मग तो भाजपचा असला तरी त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.

- Advertisement -

साकीनाका येथील पीडितेच्या कुटुंबांना तात्काळ मदत करावी. तसंच, कोविडचे निर्बंध सुरु आहेत आणि दुसरीकडे अशा घटना घडत आहेत. पोलीस काय करत आहेत? त्यांचा आणि कायद्याचा धाक का निर्माण होत नाही आहे, याचा विचार महाराष्ट्र शासनाने विचार करण्याची वेळ आलेली आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील सामूहिक बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावा अशी मागणी केली.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -