घरक्रीडाIPL 2021 PHASE 2 : खेळाडूंसाठी फ्रॅंचायसीची चार्टर्ड प्लेनची सोय, IPL साठी...

IPL 2021 PHASE 2 : खेळाडूंसाठी फ्रॅंचायसीची चार्टर्ड प्लेनची सोय, IPL साठी खेळाडू दुबईत रवाना

Subscribe

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी आणि शेवटची कसोटी कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे रद्द झाल्यानंतर आयपीएल संघांनी आपल्या खेळाडूंना यूएईमध्ये आणण्याचे प्रयत्न जोरात सुरु केले आहेत. मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज, चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू ह्या फ्रॅंचायसी इंग्लंडहून यूएईमध्ये चार्टर्ड प्लेनद्वारे आपल्या खेळाडूंना आणतील. यूएईमध्ये पोहोचल्यानंतर खेळाडूंना सहा दिवस क्वारंटाइन राहणं आवश्यक आहे.

बीसीसीआयने यापूर्वी भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीत सहभागी खेळाडूंना चार्टर्ड विमानाने १५ सप्टेंबरला इंडियन प्रीमियर लीगसाठी यूएईमध्ये आणण्याची योजना आखली होती. पाचवी कसोटी रद्द झाल्याने परिस्थिती बदलली आहे. बीसीसीआय आता खेळाडूंसाठी चार्टर्ड विमानांची व्यवस्था करत नाही.

- Advertisement -

रोहित व्यतिरिक्त, मुंबई इंडियन्सचे जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव त्यांच्या कुटुंबियांसह मँचेस्टरहून दुबईला रवाना होतील. रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, शार्दुल ठाकूर, मोईन अली आणि सॅम करन हे चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग आहेत. पंजाब संघातील कर्णधार के एल राहुल, मयंक अग्रवाल, मोहम्मद शमी आणि डेव्हिड मलान हे मँचेस्टरमध्ये आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हे देखील इंग्लंडमध्ये आहेत.

आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या सत्राची सुरुवात येत्या १९ सप्टेंबरपासून होतेय. पहिली लढत मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या संघात खेळवली जाणार आहे. आयपीएलच्या दुसऱ्या सत्राची जोरदार तयारी दुबईत करण्यात आली आहे. क्रिकेटप्रेमी इंग्लंड विरुद्ध शेवटची कसोटी रद्द झाल्याने निराश दिसून आले त्यातच आता आयपीएल चा थरार रंगणार आहे या कडे सर्वच क्रिकेट रसिक आतुरतेने वाट पाहत आहेत.

- Advertisement -

खेळाडूंच्या अडचणी वाढ

आयपीएलच्या दुसऱ्या सत्रासाठी सर्व संघांना त्यांच्या खेळाडूंना लवकरात लवकर यूएईमध्ये आणायचे आहे. आता सर्व खेळाडू खाजगी विमानाने यूएईला पोहोचणार असल्याने यूएईला पोहोचल्यानंतर त्यांना सहा दिवस क्वारंटाइनमध्ये राहावे लागेल. जर गोष्टी बीसीसीआयच्या योजनेनुसार चालल्या असत्या तर या खेळाडूंना क्वारंटाइन ठेवण्याची गरज भासली नसती.


हेही वाचा : Neeraj Chopra: पालकांसोबत केला हवाई प्रवास, नीरज चोप्राची स्वप्नपूर्ती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -