घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमहानगरपालिकेचा तांत्रिक सहाय्यक लाच घेताना रंगेहात 'एसीबी'च्या जाळ्यात

महानगरपालिकेचा तांत्रिक सहाय्यक लाच घेताना रंगेहात ‘एसीबी’च्या जाळ्यात

Subscribe

नाशिक : रस्ता खोदण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात २४ हजार रुपयांची लाच स्विकारणार्‍या नाशिक महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंबड विभागीय कार्यालयातील तांत्रिक सहायकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि.१४) अटक केली. भाऊराव काळू बच्छाव असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याला रंगेहात लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे.

महापालिकेचे डांबरी रस्ते खोदून पलीकडे केबल टाकण्यासाठी रस्ता खोदण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात बच्छाव यांनीबुधवारी (दि.१४) तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती २४ हजार रुपये देण्याचे ठरले. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार पथकाने शहानिशा करत सापळा रचला. अंबड विभागीय कार्यालयाजवळील रोडवर लाच स्विकारताना पथकाने बच्छाव यास अटक केली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -