घरमहाराष्ट्रइचलकरंजीत यंत्रमाग कामगाराचा खून; अर्धा तासात संशयित आरोपीस अटक

इचलकरंजीत यंत्रमाग कामगाराचा खून; अर्धा तासात संशयित आरोपीस अटक

Subscribe

दोन खुनाच्या धक्कादायक घटना एकाच आठवड्यात घडल्याने या भागात खळबळ

इचलकरंजी जवळ असणाऱ्या कोरोची येथे यंत्रमाग कामगाराचा खून झाल्याची घटना सोमवारी घडल्याचे समोर आले आहे. कोरोची येथील धनगर माळ येथील ही घटना असून याच भागात गेल्या आठवड्यात मद्यपी मुलाच्या त्रासाला कंटाळून आईने डोक्यात वरवंटा घालून त्याचा खून केला होता. अशा दोन खुनाच्या धक्कादायक घटना एकाच आठवड्यात घडल्याने या भागात खळबळ उडाली आहे.

असा घडला प्रकार

इचलकरंजी जवळील कोरोची येथे यंत्रमाग कामगाराचा खून करण्यात आला असून हा मित्राचा खून सहकारी कामगारानेच केला असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अर्धा तासात संशयित आरोपीस अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डांगे गल्ली सिध्दार्थ नगर झोपडपट्टी कबनूर येथे राहणारा वयवर्ष ५२ असणाऱ्या राजू आनंदा चव्हाण असे आरोपीचे नाव आहे. तर, अंकुश मारुती मोरे असे मृत पावलेल्या कामगारांचे नाव आहे.

- Advertisement -

लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, मृत कामगार मूळचा सातारा जिल्ह्यातील आहे. कोरोचीमधील धनगर माळ येथील महादेव कांबळे यांच्या कारखान्यात तो यंत्रमाग कामगार म्हणून काम करत होता. अंकुश मोरे आणि राजू चव्हाण हे दोघेही एकाच यंत्रमाग कारखान्यात काम करत होते. गेल्या तीन महिन्यापासून चव्हाण याने कारखान्यातील काम सोडले आहे.

डोक्यात दगड घालून केला खून

दुपारी या कारखान्याच्या बाजूला असलेल्या कामगारांच्या खोलीमध्ये या दोघांत वाद झाला. त्या वादातून राजू चव्हाण याने डोक्यात दगड घालून अंकुश मोरेचा खून केला. कारखान्याचे मालक सायंकाळी कारखान्यात आल्यानंतर त्यांनी कामगारांच्या खोलीत डोकावून पाहिले असता खून झाल्याचे उघडकीस आले.

- Advertisement -

दरम्यान, इचलकरंजी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपी राजू चव्हाण यास ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र खून नेमका कोणत्या कारणातून झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत पोलीस तपास करत आहेत.


पाकिस्तानात जुगार खेळणाऱ्या गाढवाला अटक; सोशल मीडियावर पोलिसांना केले ट्रोल!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -