घरदेश-विदेशपाकिस्तानात जुगार खेळणाऱ्या गाढवाला अटक; सोशल मीडियावर पोलिसांना केले ट्रोल!

पाकिस्तानात जुगार खेळणाऱ्या गाढवाला अटक; सोशल मीडियावर पोलिसांना केले ट्रोल!

Subscribe

पोलिसांनी सात-आठ जणांव्यतिरिक्त जुगार खेळणाऱ्यांसह एका गाढवाला अटक केलं आहे.

तुम्ही कधी एखाद्या गाढवाला जुगार खेळताना पाहिले आहे का? किंवा तसे ऐकले आहे का? तुम्ही विचार करत असाल, प्राणी कसे जुगार खेळू शकतात? परंतु पाकिस्तानमध्ये असा प्रकार घडला आहे. तेथे एका गाढवाला जुगार खेळण्याप्रकरणी अटक केली आहे.

हे एकूण तुम्हाला नवल नक्की वाटले असेल, परंतु हा प्रकार सत्य आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहिम यार खान भागात पोलिसांनी सात-आठ जणांव्यतिरिक्त जुगार खेळणाऱ्यांसह एका गाढवाला अटक केलं आहे. विशेष म्हणजे एफआयआरमध्ये गाढवाचे नावदेखील नोंदवण्यात आले आहे. दरम्यान, गाढवाच्या अटकेसंदर्भात रहीम यार खान परिसराचे एसएचओ म्हणाले की, संशयितांव्यतिरिक्त गाढवाचे नावही एफआयआरमध्ये नोंदवल्याचे सांगितले असून त्या गाढवाला पोलिस स्टेशनच्या बाहेरही बांधले असल्याचेही सांगितले जात आहे.

- Advertisement -

जुगार खेळणाऱ्या आरोपींकडून १ लाख २० हजार रुपये जप्त करण्यात आले असून ते गाढवाच्या शर्यतीवर पैसे खर्च करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. गाढवाला अटक झाल्याची बातमी लोकांना समजताच त्यांनी सोशल मीडियावर पोलिसांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. लोक पोलिसांच्या या कारवाईची चेष्टा करत आहेत. पाकिस्तानमध्ये सर्वाधिक गाढवं असून ते इतर देशांमध्ये देखील निर्यात केली जाते.


पहिल्यांच दिवशी एसटी-बेस्टचा उडाला फज्जा; फिजिकल डिस्टन्सिंग वाजले तीन तेरा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -