तरुणाचा खून; शरीराचे तुकडे दोन गोण्यांत भरुन फेकले नदीत

मृत तरुणाची आेळख पटवण्याचे व खुन्यांचा शोध घेण्याचे आव्हानात्मक काम पोलीस यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे.

Murder of youth; The body parts were thrown in two sacks into the river
Murder of youth; The body parts were thrown in two sacks into the river

अकोले तालुक्यातील वाकी शिवारामध्ये एका तरुणाचा अमानुषपणे खून करुन त्याच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. हे मृतदेह दोन गोण्यांमध्ये भरुन कृष्णावंती नदीत फेकण्यात आले होते. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. घटनास्थळी राजुरचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचे हे तुकडे पोलीस ठाण्यात आणले. दरम्यान मृत तरुणाची आेळख पटवण्याचे व खुन्यांचा शोध घेण्याचे आव्हानात्मक काम पोलिस यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे.

संबंधीत मृतदेह सकृतदर्शनी पंचवीस वर्षीय तरुणाचा असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. गुरुवारी सकाळी वाकी शिवारातुन वाहणाऱ्या कृष्णावंती नदीत िकनाऱ्यावर दोन गोण्यामध्ये भरुन काहीतरी तरंगतांना दिसले. या गोण्यांचा वास येत असल्याने लोक काय आहे हे पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. याची माहिती वाकीचे पोलीस पाटील सोमनाथ सगभोर यांनी राजूर पोलिसांना दिली. माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक पाटील, उपनिरीक्षक नितीन खैरनार यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी दुर्गंधी सुटलेल्या या गोण्यांची तपासणी केली असता त्यात एका व्यक्तीचा तुकडे केलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. साधारणत: वीस-पंचवीस वर्षीय तरुणाचा हा मृतदेह असून खुन झालेली व्यक्ती कोण, त्याचा खून कोणी आणि कश्यासाठी केला, याचा उलगडा पोलिसांना करावा लागणार आहे. खून करुन मृतदेहाचे तुकडे करत ते गोण्यात भरुन नदीपात्रात फेकून देण्याचा तालुक्यातील हा पहिलाच प्रकार असून यामुळे राजूर परिसरासह अकोले तालुक्यात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपासासंदर्भात सूचना केल्या.