घरताज्या घडामोडीLoudspeaker: मशीदीवरील भोंग्याचा आवाज नियंत्रणासाठी मुस्लिम संघटनांचा पोलिसांना सकारात्मक प्रतिसाद - गृहमंत्री

Loudspeaker: मशीदीवरील भोंग्याचा आवाज नियंत्रणासाठी मुस्लिम संघटनांचा पोलिसांना सकारात्मक प्रतिसाद – गृहमंत्री

Subscribe

एखाद्या परिसरात असलेल्या मशीदीच्या भोंग्यांमुळे एकाचवेळी होणाऱ्या ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठीचा मुद्दा समोर आला आहे. मुंबई आणि महाराष्ट्राच्या पोलिसांकडून मुस्लिम संघटनांकडून चर्चा सुरू आहे. त्यामध्ये कायद्याचे पालन करावे लागेल, याबाबतची चर्चा करण्यात आली आहे. मुस्लीम संघटनांकडूनही चांगला प्रतिसाद आला आहे, असेही गृहमंत्री म्हणाले. त्यामुळे येत्या काळात आवाजाची मर्यादा राखण्यासाठीचे पाऊल असण्याचे संकेत मिळाल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. मशीदी समोर हनुमान चालीसा लावण्याच्या मुद्द्यावर केल्या जाणाऱ्या दावे आणि प्रतिदावे यानिमित्ताने ते बोलत होते.

राज्यात शांतता आणि सलोख राखण्यासाठी मुस्लीम विचारवंतांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांचे पालन करण्याचा हा विषय आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशीदीवरील भोंग्याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर विचारवंत आणि कार्यकर्त्यांनी एक बैठक झाली. यामध्ये अजानच्या वेळी आवाजाची मर्यादा राखण्याबाबतही संघटनांचा विचार सुरू आहे. त्यामुळे या विषयात राज्याच्या पोलिसांनाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

डेसिबलचे उल्लंघन केल्यास कारवाई

न्यायालयाच्या आदेशामध्ये भोंगे काढावेत असे कुठेही म्हटलेल नाही, भोंग्यांचा आवाज हा डेसिलबलच्या मर्यादेत असावा असा न्यायालयाचा निर्णय आहे. ज्या मशीदींनी किंवा मंदिरांनी परवानगी घेऊन लाऊडस्पीकर लावले आहेत, अशा ठिकाणी भोंगे काढण्याचा प्रश्न येत नाही. फक्त न्यायालयाने अटी घालून दिल्या आहेत, त्या अटी शर्थीचा पालन करणे गरजेचे आहे. आवाजाच्या डेसिलबलचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करणार असाही इशारा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.

सर्वांना सांगायच आहे कोणतीही व्यक्ती, पार्टी, संघटनेने कायदा हातात घेऊ नये. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात डेसिबलची मर्यादा ठेवण्यात आली आहे. रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत स्पिकर लावण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. डेसिबलची मर्यादा उल्लंघन झाल्यास कारवाईचे आदेश देण्यात आले असल्याचेही वळसे पाटील यांनी सांगितले. हनुमान चालीसा करा किंवा धार्मिक पाठ करा तो आपआपल्या घरी करावा. त्यामुळे सार्वजनिक जीवन हे बाधित होता कामा नये. ज्यांना जे करायचे आहे त्यांनी त्या घरी आपल्या घरात आणि मंदिरात कराव्यात असेही त्यांनी सांगितले. मुंब्रा येथील पीएफआय संघटनेकडून जशास तसे उत्तर मिळेल असा इशारा देण्यात आला आहे. त्यावर बोलताना वळसे पाटील म्हणाले की, मी वारंवार सांगतोय की पोलीस तयारीत आहेत. त्यामुळे अशी कोणतीही धमकी कोणीही देऊ शकत नाही. पोलीस योग्य कारवाई करत ही परिस्थिती हाताळतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -