घरताज्या घडामोडीमी स्वतः दररोज हनुमान चालिसा वाचतो, पण..,पटोलेंचा राज ठाकरेंवर निशाणा

मी स्वतः दररोज हनुमान चालिसा वाचतो, पण..,पटोलेंचा राज ठाकरेंवर निशाणा

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेवरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. मशिदी विरुद्ध हनुमान चालीसा असा संघर्ष आता पहायला मिळत आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मी स्वतः हिंदू आहे, मी स्वतः दररोज हनुमान चालिसा वाचतो, पण मी त्याचा बाऊ करत नाही, असं नाना पटोले म्हणाले.

नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, खरंतर हिंदू-मुस्लीम हा वाद महागाईवरून लोकांचं लक्ष बाजूला सारण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. आमची राज्य सरकारला विनंती आहे की अशा पद्धतीने धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना मग ते कोणीही असो त्यांना सभा घ्यायला बंधनं घातली पाहिजेत. त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे, असं नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

मी स्वतः हिंदू आहे, मी स्वतः दररोज हनुमान चालिसा वाचतो, पण मी त्याचा बाऊ करत नाही. धार्मिक तेढ निर्माण केला जातोय आणि महागाई बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न यामध्ये केंद्रातील सरकारचं अपयश समोर येतंय, असं नाना पटोले म्हणाले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, देशात ४० लाख लोकं कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ४० लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे केंद्राचं अपयश लपवण्यासाठी देशात हा धार्मिक तेढ निर्माण केला जातोय, असा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : IPL 2022 : कोरोनाच्या विळख्यात दिल्लीची टीम, एक खेळाडू पॉझिटिव्ह; पुढे काय होणार?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -