चूक नसतानाही काँग्रेसची चूक दाखवण्याची परंपरा सुरूच, नाना पटोलेंची केंद्र सरकारवर टीका

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election 2022) महाराष्ट्रातून (Maharashtra) परप्रांतीय उमेदवारी देणाऱ्या काँग्रेसवर टीका करणाऱ्या विरोधकांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतित्यूर दिलं आहे. काँग्रेसची चूक नसतानाही चूक दाखवण्याची परंपरा सुरू झाली आहे. केंद्रातील आठ वर्षांच्या कमकुवत सरकारने हे देश बरबाद केलं. तसेच या सर्व गोष्टी लपवण्यासाठी काँग्रेसच्या एखाद्या नेत्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे ही एक प्रकारची त्यांची मानसिकता आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केली आहे.

राहुल गांधी आणि सोनिया गांधींचं आभार व्यक्त करतो

नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आमचे काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगडी यांनी उमेदवार अर्ज भरला आहे. तसेच त्यांनी अर्ज भरताना मराठीतून शपथ घेतली आहे. त्यामुळे देशाची एकात्मता आणि त्या विचाराला व भाषेला माननारा उमेदवार आमच्या हायकमांडने आम्हाला दिला आहे. त्यामुळे आम्ही राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचं आभार व्यक्त करतो.

दिवसा पण स्वप्न बघणारी विरोधक आम्ही पाहिलेत

भाजपने कोल्हापूरातून तिसऱ्या उमेदवाराला संधी दिली असून त्यांच्याकडे मॅजिक फिगर असल्याचं बोललं जातंय. तसेच काँग्रेसमधून नाराजी असल्याचं सांगितलं जातय असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता नाना पटोले म्हणाले की, निवडणुकीला जास्त दिवस राहिलेले नाहीयेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर त्यादिवशीपासूनचं दिवसा पण स्वप्न बघणारी विरोधक आम्ही पाहिले आहेत. दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ ऑगस्टला झेंडा फडकावणाऱ्या लोकांची स्वप्नं राज्यातील जनतेला माहिती आहेत. त्यामुळे ही मॅजिक फिगर लोकांच्या समोर येऊ द्या, असं नाना पटोले म्हणाले.

राज्यसभेसाठी खुल्या पद्धतीने मतदान करावं लागतं. त्यामुळे ही गोष्ट लोकांसमोर येऊ द्या. त्यामुळे ही परंपरा महाराष्ट्रात राहिली आहे. राज्यसभेच्या निवडणुका या बिनविरोध होतात. परंतु विरोधकांचा दावा असेल तर त्याच्यावर आम्हाला कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया द्यायची नाहीये.

भाजपमध्ये लोकशाही नाही

इम्रान प्रतापगडी हे नगमा यांच्यापेक्षा पात्रतेचे नेते आहेत का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता नाना पटोले म्हणाले की, व्यक्तिगत मत मांडण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. ही त्यांनी मांडलेलं आहे. काँग्रेसमध्ये लोकशाही आहे. भाजपमध्ये सुद्धा नाराजी आहे. मात्र, त्यांच्यामध्ये लोकशाही नाहीये, अशी टीका नाना पटोलेंनी भाजपवर केली आहे.


हेही वाचा : काही लोक आम्हाला मतदान करणार, तिसरा उमेदवार निवडून येणार, फडणवीसांना विश्वास