घरमहाराष्ट्रअंबानीसाठी भाजपने महाराष्ट्राच्या विधानसभेचा दुरुपयोग केला; नाना पटोलेंचा आरोप

अंबानीसाठी भाजपने महाराष्ट्राच्या विधानसभेचा दुरुपयोग केला; नाना पटोलेंचा आरोप

Subscribe

महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी वाझेंना भाजपने खलनायक बनवलं

अंबानी कुटुंबासाठी भाजपने महाराष्ट्राच्या विधानसभेचा दुरुपयोग केला, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी वाझेंना भाजपने खलनायक बनवलं, असं नाना पटोले म्हणाले. डबल ढोलकी वाजवण्याचे काम भाज करत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. यावेळी त्यांनी राज्यातील वीज तोडणीवरून सरकारला गर्भीत इशाराही दिला. सांगलीमध्ये आज पत्रकार परिषदेत नाना बोलत होते.

महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी सचिन वाझेला खलनायक ठरवण्याचं काम भाजपकडून करण्यात आलेलं आहे. अंबानीच्या घरापासून लांब ती गाडी सापडली होती. त्यामध्ये स्फोटक नसल्याचंही समोर आलेलं आहे. मात्र, असं असताना अंबानी कुटुंबाला झेड प्लस सुरक्षेसाठी, त्यांच्या घरावर हेलिकॉप्टर परवानगी मिळावी यासाठी भाजपने महाराष्ट्राच्या विधानसभेचा दुरुपयोग केला, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. पुढे बोलाताना डबल ढोलकी वाजवण्याचं काम भाजप करत असून मनसुख हिरेन प्रकरणी तपास आता एनआयएकरत आहे. त्यामुळे त्यांचा तपास होईल, असा टोला लगावाला आहे.

- Advertisement -

सचिन वाझेंना २५ मार्चपर्यंत NIA कोठडी

सचिन वाझे यांना NIA च्या विशेष कोर्टाने २५ मार्चपर्यंत NIA कोठडी मान्य केली आहे. एनआयएने १४ दिवसांची कोठडी मागितली होत. मात्र कोर्टाने दहा दिवसांची कोठडी मान्य केली आहे.


हेही वाचा –  वाझे पूर्वीचे शिवसैनिक होते म्हणून वाचवलं जातंय का? फडणवीसांचा सवाल

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -