घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांचा ३ तासांचा कोकणातला पिकनिक दौरा, नारायण राणे यांचे टीकास्त्र

मुख्यमंत्र्यांचा ३ तासांचा कोकणातला पिकनिक दौरा, नारायण राणे यांचे टीकास्त्र

Subscribe

मराठा आरक्षणाला पुर्णपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच जबाबदार

तौत्के चक्रीवादळामध्ये कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २१ मे रोजी ३ तासांचा नुकसानग्रस्त भागाचा धावता दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी कोकणातील नुकसानीचा आढावा घेतला होता. या दौऱ्यावर भाजप नेते नारायण राणे यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेला ३ तासांचा दौरा नौटंकी आणि पिकनिक दौरा असल्याचे राणे यांनी म्हटले आहे. २ दिवसांत मदतीचे पॅकेज का जाहीर केले नाही असा घणाघातील हल्ला नारायण राण यांनी केला आहे. मराठा आरक्षण रद्द होण्यासही मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोप भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री तौत्के चक्रीवादळानंतर कोकणातील नुकसानाची आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर गेले. दौऱ्यावर गेले? पिकनिकला गेले? कशाला गेले? किती तासाचा दौरा विमान प्रवास धरून? असे सवाल उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी म्हटले नुकसानग्रस्तांना मदत २ दिवसांत जाहीर करु अजूनही मदत जाहीर केली नाही. निसर्ग चक्रीवादळाप्रमाणे एवढे कोटी देऊ असे सांगितले. २०० कोटीचे पॅकेज जाहीर करा अशी मागणी भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे. वादळ संपल्यानंतर वादळ पाहायला मिळाले असा हा दौरा असल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर नारायण राणेंनी टीका केली आहे.

- Advertisement -

राज्य सरकारच्या तिजोरीत राज्यातील नागरिकांना देण्यासारखे काही नाही. कोरोनामुळे आतापर्यंत ८० हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. लस नाही, व्हेटीलेटर नाही टेंडरसाठी पैसे खातात याची मला पुर्ण माहिती आहे. कोरोना काळात मोठा घोटाळा करण्यात आला असल्याचा आरोप नारायण राणेंनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. दुष्काळ, अतिवृष्टीमध्ये घरोघरी जावून पंचनामे करावे लागतात. ज्या विमानतळावर उतरलात त्या विमानतळ आधी सुरु करा, विमानतळावर उतरण्यास परवानगी नाही तिथे मुख्यमंत्री कसे काय उतरतात असा घणाघात देखील राणेंनी केला आहे.

राज्यपालांची पाठराखण

महाराष्ट्राचे राजभवन जिथे राज्यपाल राहतात तिथे भुताटकी मग सामनात भुताटकी नाही का? वर्षामध्ये भुताटकी नाही जिथे लोकांचे पैसे खाल्ले जातात. आज जर भुताटकी कुठे असेल तर ती वर्षा, मंत्रालय या ठिकाणी आहे. तिथे पहिले शांती यज्ञ करा नाहीतर मन शांती करा असे सांगत संजय राऊतांना ही भाषा शोभणारी नाही असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

मराठा आरक्षणावरुन मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल

मराठा आरक्षणाला पुर्णपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मनात मराठा समाजाला न्याय द्यायचे आहे. म्हणून सर्वोच्च न्यायालयात ज्या मुद्द्यावर लढले पाहिजे होते. माहिती दिली पाहिजे होती तशी देण्यात आली नाही. यामुळे जी कारणे सर्वोच्च न्यायालयान दिली आहेत ती पाहता हे राज्य सरकारचे अपयश आहे. असा घणाघात भाजप नेते नारायण राणे यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -